मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रोकोली पुलाव

Photo of Broccoli Pulav by Vaishali Joshi at BetterButter
25
3
0.0(0)
0

ब्रोकोली पुलाव

Jan-31-2019
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रोकोली पुलाव कृती बद्दल

शरीराला पोषक तत्वे असलेल्या भाज्या वापरून तयार केलेला हा पुलाव ब्रोकोली टाकल्यामुळे अजूनच मस्त झालाय तूम्हीही करून बघा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ १-१/२ कप
  2. ब्रोकोली २५० ग्रॅम छोटे तुकड्यांत चिरून
  3. कांदा १ लांब चिरलेला
  4. हिरव्या मिरच्या २-३ चिरून
  5. बटाटा १ सालासकट चिरून
  6. गाजर १/२ छोटे तुकड्यांत चिरून
  7. मटारचे दाणे १/२ वाटी
  8. आल लसूण पेस्ट १ टिस्पून
  9. तेल २ टिस्पून
  10. साजुक तूप १ टिस्पून
  11. जिर १ टिस्पून
  12. पाणी
  13. खडे मसाले - मोठी वेलची २
  14. छोटी वेलची २-३
  15. तेज पान १
  16. स्टार फूल १
  17. दालचिनी १- २ तुकडे

सूचना

  1. आधी सर्व तयारी करून घ्या व तांदुळ धुवून निथळून ठेवा
  2. गॅस वर कुकर मध्ये तेल आणि साजुक तूप घाला
  3. खडे मसाले आणि जिरे घाला
  4. कांदे मिरच्या घालून परता नंतर आल लसूण पेस्ट घाला परतून घ्या
  5. बटाटे , गाजर , मटार घालून थोडे परतून घ्या ५ मिनिटे शिजू द्या आणि ब्रोकोली घालून परतून घ्या
  6. नंतर तांदुळ घालून २-३ मिनिटे परतून घ्या
  7. उकळते पाणी घालून ते परता आणि चवीनुसार मिठ घालून एकत्र करून घ्या
  8. कुकरचे झाकण लावून १शिट्टी काढून घ्या व कुकर थंड झाल्यावर बरोबर शिजला की नाही खात्री करून घ्या
  9. प्लेट मध्ये काढून घेऊन सर्व्ह करा खूप छान कलरफुल आणि टेस्टी असा ब्रोकोली पुलाव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर