मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी मुठिया

Photo of Bottle gourd snacks by Susmita Tadwalkar at BetterButter
610
3
0.0(0)
0

दूधी मुठिया

Feb-01-2019
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी मुठिया कृती बद्दल

दुधी भोपळ्याची भाजी खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो. फक्त कोफ्ता करीच. पण तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा हा एक पौष्टिक पदार्थ जास्त चांगला नाही का? म्हणूनच चटपटीत आणि पौष्टिक असा एक पदार्थ बघा करून!

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक लहान दुधी भोपळा
  2. एक छोटा कांदा
  3. आलं मिरची यांची पेस्ट
  4. एक चमचा धनेजिरे पूड
  5. चवीपुरते मीठ
  6. तीन मोठे चमचे तांदुळाचे पीठ
  7. तीन मोठे चमचे बेसन
  8. फोडणीसाठी दोन चमचे तेल
  9. मोहरी, हिंग व थोडे तीळ फोडणीसाठी
  10. खोबरे कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. दुधीची साले काढून किसून घ्या
  2. कांद्याची साले काढून किसून घ्या
  3. दोन्ही एकत्र करून हलक्या हाताने दाबून पाणी काढून घ्या
  4. आता त्या मिश्रणात आलं मिरची पेस्ट व मीठ धने-जिरेपूड, व‌ थोडं तिखट घाला
  5. नीट एकत्र करून या मिश्रणाचा गोळा बनवा
  6. या गोळ्याचे आता लांबट रोल्स बनवा
  7. कुकरची शिटी काढून वाफवून घ्या
  8. आता हे रोल्स गार करून घ्या व त्याच्या वड्या पाडा
  9. तव्यावर किंवा फ्राय पॅनमध्ये तेल गरम करा
  10. तेलामध्ये मोहरी हिंग व थोडे तीळ घाला
  11. तेलामध्ये वड्या घालून मंद आचेवर परता
  12. खरपूस झाल्यावर प्लेटमध्ये काढा
  13. खोबर, कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर