मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटोची चटणी

Photo of Tomato chutney by Susmita Tadwalkar at BetterButter
931
2
0.0(0)
0

टोमॅटोची चटणी

Feb-01-2019
Susmita Tadwalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटोची चटणी कृती बद्दल

टोमॅटोची आरोग्याला चालणारी व सहज तयार होणारी ही एक पाककृती. डाएट करणार्‍या लोकांसाठी तर अतिशय उत्तम!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन मोठे टोमॅटो
  2. चार लसणाच्या पाकळ्या
  3. तीन ते चार हिरव्या मिरच्या
  4. थोडीशी कोथिंबीर
  5. एक छोटा चमचा तेल
  6. पाव चमचा मोहरी
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. टोमॅटो स्वच्छ धुवून व फोडी करून घ्या
  2. तेल गरम करून त्यात मोहरी टाका
  3. मोहरी तडतडल्यावर लसूण टाका
  4. लसुण परतल्यावर टोमॅटोच्या फोडी टाका
  5. दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवा
  6. टोमॅटो म‌उ झाले की गॅस बंद करा
  7. गार झाल्यावर मिक्सर मध्ये मिरची टोमॅटो कोथिंबीर व मीठ घालून जाडसर वाटा
  8. टोमॅटो चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर