मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी मुठीया

Photo of Cabbage Muthiya by Deepa Gad at BetterButter
29
8
0.0(0)
0

कोबी मुठीया

Feb-01-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी मुठीया कृती बद्दल

ही एक गुजराती डिश आहे. मस्त कमी तेलात होणारी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, लहान मुले तसेच मोठेही आवडीने खातील. आपण मेथी, कोथिंबीर, मुठीया तर करतोच पण मी आज कोबीचे मुठीया केलेत खूप छान झालेत तर पाहू या रेसिपी....

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • गुजरात
 • पॅन फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. पाव किलो कोबी
 2. १/४ कप गव्हाचे पीठ
 3. १/४ कप बेसन
 4. १/४ कप बारीक रवा
 5. १ च आलं लसूण पेस्ट
 6. १ च धने जिरे पावडर
 7. १ च तिखट
 8. १/२ च हळद
 9. १/४ च हिंग
 10. १ च दही
 11. १ च तेल
 12. कढीपत्ता
 13. फोडणीसाठी :
 14. तेल २-३ च
 15. मोहरी १ च
 16. १/२ च हिंग
 17. १ च तीळ
 18. २ हिरव्या मिरच्या
 19. कढीपत्ता
 20. लिंबूरस
 21. ओले खोबरे
 22. कोथिंबीर

सूचना

 1. कोबी किसून बाजूला ठेवा
 2. भांड्यात रवा, गव्हाचे पीठ, बेसन घ्या
 3. बाकी सर्व मसाले, आले लसूण पेस्ट, दही, तेल, मीठ घाला.
 4. पाणी न घालता किसलेल्या कोबीतच एकजीव करा.
 5. हाताला तेल लावून २ लांबट गोळे बनवा.
 6. गॅसवर पातेल्यात पाणी गरम करून वर चाळणी ठेवा.
 7. चाळणीला तेल लावा
 8. त्यावर हे गोळे वाफवायला ठेवा
 9. १५ मिनिटे वाफवल्यानंतर काढून थंड करा नंतर सुरीने वड्या कापा.
 10. पॅन मध्ये फोडणीसाठी तेलात मोहहरी, हिंग, कढिपत्ता, तीळ, हिरव्या मिरच्या, घाला
 11. त्यावर कापलेल्या मुठीया घाला.
 12. थोडावेळ अलगद परतून घ्या. थोडे लालसर झाले की डिशमध्ये काढा. वरून खोबरे, कोथिंबीर पेरा. हवे असल्यास लिंबूरस घाला नि सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर