मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक मेथीचे खमंग लाडू

Photo of Healthy Fenugreek Ladoos by Shraddha Juwatkar at BetterButter
487
4
0.0(0)
0

पौष्टिक मेथीचे खमंग लाडू

Feb-01-2019
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक मेथीचे खमंग लाडू कृती बद्दल

थंडी सुरु झाली की मेथीचे लाडू घरोघरी बनवले जातात.वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 50 ग्राम मेथी
  2. 1 कप सोयाबीन पीठ
  3. 1 कप गव्हाचे पीठ
  4. 2 कप सुके खोबरे किसून
  5. 50 ग्राम मखाने
  6. 50 ग्राम डिंक
  7. 25 ग्राम अळीव
  8. पाव किलो खारीक पावडर
  9. अर्धा किलो गूळ
  10. अर्धा किलोला थोडे कमी साजुक तूप
  11. 1 वाटी काजू व बदाम
  12. पाव वाटी ओवा
  13. पाव वाटी खसखस
  14. दूध आवश्यकतेनुसार

सूचना

  1. मेथी मिक्सरमध्ये पावडर करून एका मोठ्या पातेल्यात घेणे व त्यावर गरम गरम दूध घालावे व ढवळून घ्यावे. गुठळ्या राहता कामा नये. 3/4 तासासाठी झाकून ठेवावे.
  2. 3/4 तासानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात सुके खोबरे खमंग भाजून ताटात काढुन घेणे, खसखस भाजून घ्यावी व नंतर अळीव परतून घ्यावे शेवटी ओवा परतावा. हे सर्व जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
  3. त्याच कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घेणे. थंड झाल्यावर हाताने चुरून घेणे.
  4. खारीक पावडर पण थोडया तुपात परतून घ्यावी.
  5. मखाने पण तुपात लालसर होईपर्यंत परतून घ्यावे व मिक्सरमध्ये बारीक पूड करावी.
  6. एक चमचा तूप घालून काजू व बदाम वेगवेगळे परतून दोघांची मिक्सरमध्ये भरडसर पूड करून घेणे.
  7. पुन्हा कढईत तूप गरम करून त्यात सोयाबीन पीठ व गव्हाचे पीठ वेगवेगळे खमंग रंग बदले पर्यंत भाजून घ्यावे.पीठ भाजायला साधारण अर्धा तास लागतो.
  8. शेवटी जास्तीचे तूप घालून मेथीची पावडर खमंग वास येईपर्यंत व तूप सुटेपर्यंत भाजून घेणे.
  9. वरील सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.
  10. त्याच कढईत पुन्हा एक चमचा तूप घालून गूळ घालून वितळावा.गूळ वितळला की गॅस बंद करावा व वरील मिश्रणात ओतावे व लगेचच ढवळून कोमट असतानाच लाडू वळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर