मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमलामिर्ची , बीट आणि गाजराचे लोणचे

Photo of Simlamirchi , Beetroot aani Gajarache Lonche by Vaishali Joshi at BetterButter
17
3
0.0(0)
0

सिमलामिर्ची , बीट आणि गाजराचे लोणचे

Feb-02-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमलामिर्ची , बीट आणि गाजराचे लोणचे कृती बद्दल

थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे या तिन्ही भाज्या मोठ्या तुकड्यांत चिरल्यामुळे खूप डिफ्रंट टेस्ट लागते .तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा .

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • लोणचं / चटणी वगैरे
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. सिमला मिर्ची १ मोठी
 2. बीटरूट १ मोठे
 3. गाजर १
 4. तिखट २ टिस्पून
 5. हळद १/२ टिस्पून
 6. मोहरीची डाळ १ टिस्पून
 7. हिंग
 8. राई
 9. मेथी दाणे १/२ टिस्पून
 10. बडीशेप १/२ टिस्पून
 11. १ लिंबाचा रस
 12. मिठ चवीनुसार
 13. तेल १/२ कप

सूचना

 1. सिमला मिर्ची , बिट आणि गाजराचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या
 2. मेथीदाणे आणि बडिशेप किंचित तेलावर परतून घ्या आणि कुटून घ्या
 3. तिखट आणि मोहोरिची डाळ मिक्सर मध्ये एकत्र बारीक फिरवून घ्या
 4. आता एक बाऊल मध्ये सर्व म्हणजे-बारीक केलेलं तिखट आणि मोहोरिची डाळ , हळद , मेथीदाणे आणि बडिशेप कुटून ठेवलेली , मिठ एकत्र करून लोणच्याचा मसाला करून घ्या
 5. गॅस वर कढई तापत ठेवा आणि त्यात किंचित तेलावर सिमला मिर्ची , गाजर आणि बिट चे तुकडे वाफवून घ्या आणि थंड करून घ्या( खुप जास्त प्रमाणात शिजवायचे नाही )
 6. एक कढल्यात तेल घालून ते तापल्यावर त्यात राई आणि हिंग घालून फोडणी करा आणि ती थंड झाल्यावर त्यात वाफवून ठेवलेले तुकडे आणि मसाला एकत्र करून घ्या आणि वरून लिंबाचा रस घालून ढवळुन घ्या
 7. बस झाले की चटपटीत सिमला मिर्ची, बिट आणि गाजराचे लोणचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर