मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्सड् भाज्या आणि पोहे चे मिनी थालीपीठ

Photo of Mixed Bhajya aani Pohe che Mini Thalipith by Vaishali Joshi at BetterButter
835
5
0.0(0)
0

मिक्सड् भाज्या आणि पोहे चे मिनी थालीपीठ

Feb-02-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्सड् भाज्या आणि पोहे चे मिनी थालीपीठ कृती बद्दल

शरीराला पोषक अशा भाज्या आणि पातळ पोहे मिक्स करून हे मिनी थालीपीठ बनविले आहे . छान खुसखुशीत होतात आणि त्या अनुषंगाने भरपूर प्रमाणात भाज्या पण पोटात जातात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. फुलकोबी अंदाजे ३-४ फुल म्हणजे तुकडे
  2. मटार अंदाजे १/४ वाटी
  3. टोमॅटो १
  4. कांदा १
  5. हिरवी मिरची २
  6. गाजर १/२
  7. कोथिंबीर
  8. पातळ पोहे २ वाट्या
  9. कणीक १/२ वाटी
  10. तिखट आवडीनुसार
  11. मिठ चवीनुसार
  12. हळद
  13. तेल
  14. धणे जिरे पावडर १ चमचा

सूचना

  1. फुलकोबी , मटार , कांदा , टोमॅटो , गाजर , मिरची आणि कोथिंबीर सर्व भाज्या फुडप्रोसेसर मध्ये बारीक चौप करून घ्या
  2. एक मिक्सिंग बाऊल मध्ये काढून घेऊन त्यात कणीक , पातळ पोहे , तिखट , हळद , धणे जिरे पावडर , मीठ आणि थोड तेल घालून चांगले भिजवून ठेवावे लागल्यास थोडे पाणी घालावे व छान गोळा करून घ्यावा
  3. गॅस वर नॉनस्टिक पॅनवर किंचित तेल घालून त्यावर तयार पिठाचे छोटे छोटे थालीपीठ करून घालावे
  4. दोन्ही बाजूंनी थोड थोड तेल घालून खमंग भाजून घ्यावे
  5. गरमागरम तयार मिनी थालीपीठ आवडीनुसार कशाही बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर