मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची बर्फी

Photo of Ratalyachi (Sweet potato ) Barfi by Vaishali Joshi at BetterButter
768
6
0.0(0)
0

रताळ्याची बर्फी

Feb-02-2019
Vaishali Joshi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची बर्फी कृती बद्दल

रताळ खुप पोषक असे कंदमुळं आहे पण ते खुप प्रमाणात काही खाल्ले जात नाही , म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून ते खायला घालण्याचा प्रयत्न . बच्चे कंपनी नक्की आवडिने खाणार बघा .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रतळी ( कंद / स्वीटपोटैटो ) ५०० ग्रॅम
  2. गुळ ११/२ वाट्या
  3. वेलची पावडर १ चमचा
  4. डेसिकेटेड खोबराकीस १/२ कप
  5. साजुक तूप ३ चमचे

सूचना

  1. आधी रताळी कुकर मध्ये उकडून घ्या
  2. थंड झाल्यावर सोलून त्याचा गर मैश करून घ्या आणि वाटीने मोजून घ्या
  3. जेवढा रताळ्याचा गर असेल तेवढाच गुळ घेऊन तो किसून घ्यावा
  4. आता बर्फी करायला घेऊ - गॅस वर कढई तापत ठेवा आणि त्यात २१/२ चमचे साजूक तूप घालून रताळ्याचा गर घालून खमंग भाजून घ्या
  5. आता त्यात डेसिकेटेड खोबराकीस घालून पुन्हा एकदा भाजून घ्या
  6. मग किसलेला गुळ घालून तो वितळून मिश्रण घट्टसर झाले की त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा आणि गैस बंद करा
  7. तूप लावलेल्या थाळीत मिश्रण काढून थापून घ्या आणि वरून पुन्हा थोडा डेसीकेटेड कोकोनट भुरभुरावे आणि थंड होऊ द्यावे
  8. मनपसंत आकाराच्या बर्फी कट करून घ्या
  9. खायला तयार रताळ्याची बर्फी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर