मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक नानखटाई

Photo of Cookies by Aditya Pethkar at BetterButter
816
1
0.0(0)
0

पौष्टिक नानखटाई

Feb-04-2019
Aditya Pethkar
120 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक नानखटाई कृती बद्दल

मैदा चा उपयोग न करता

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. गव्हाचे पीठ 2 वाट्या
  2. बेसन 1 वाटी
  3. रवा 1 टेबलस्पून
  4. साखरेची पीठी 1 वाटी
  5. वेलचीपूड 1 चमचा
  6. साजूक तूप 1 वाटी
  7. बदाम ,काजूचे कप

सूचना

  1. सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी साजूक तूप हे चांगले फेटून घ्या साखर आणि तूप हे चांगले मिक्स होऊ पर्यंत फेटा. आता त्यात गव्हाचे पीठ हे चालून टाका आणि बेसन,रवा सुद्धा टाका व वेलचीपूड .आता त्याला पूर्ण मळून घ्या आता हे मिश्रण पुठ्ठीच्या लाडवा प्रमाणे झाले असेल . आता कूकर मध्यम आच वर गॅस वर ठेवा त्यात दीड वाटी मीठ घाला आणि आता कुकर चा झाकण लावा *(NOTE- कुकर चे व्हीसल आणि रिंग काढून घेणे )* आणि आता ह्याला *PREHEAT* करून ध्या . आता आपल्या मिश्रणाचे पेढा सारखे गोळे बनवून घ्यायचे आहे व खात्री असू द्या की एकदम जाडे पण नाही आणि एकदम बारीक पण नको मध्यम आकाराचे करा .आता त्या गोळाच्या मधात बदाम किव्हा पिस्ता लावा आणि हे थोडे चापट करा पण जास्त नाही आणि आता हे मी इडली पात्रात बेक करून घेत आहे (जर तुमचा कडे इडली पात्र नसेल तर तुम्ही एका प्लेट वर सुद्धा बेक करू शकता ) आता इडली पात्रामधील प्लेट्स ला आपण तुपाने ग्रीसिंग कारुया आणि आता इडली पात्रात आपण ते गोळे ठेवूया आणि एक लक्षात घ्या की इडली चा प्लेट्स ह्या एका वर एक ठेवताना सांभाळून ठेवा. आता हे इडली स्टँड कुकर मध्ये ठेवा आणि *१०-१२* मिनिटे बेक करून घ्या व नंतर एका प्लेट्स मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर