मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या लाह्यांचे हेल्दी बाईट्स

Photo of Jwar puff healthy bites. by Archana Chaudhari at BetterButter
38
7
0.0(0)
0

ज्वारीच्या लाह्यांचे हेल्दी बाईट्स

Feb-04-2019
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या लाह्यांचे हेल्दी बाईट्स कृती बद्दल

संध्याकाळी स्नॅक्स मध्ये ...टिफिन मध्ये...देण्यासाठी ऊत्तम... पचनास हलकं,व्हिटॅमिनयुक्त हे बाईट्स बिनधास्त खा:blush:

रेसपी टैग

 • मध्यम
 • एव्हरी डे
 • शॅलो  फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. ज्वारीच्या लाह्या ३ कप
 2. ताजे वाटणे १ कप उकडून घेतलेले
 3. मोड आलेले हरभरे १/२ कप उकडून घेतलेले
 4. लसूण,हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट २ टेबलस्पून
 5. हळद १/४ टीस्पून
 6. तिखट १/४ टीस्पून
 7. हिंग १/४ टीस्पून
 8. मीठ चवीनुसार
 9. तेल २ टीस्पून

सूचना

 1. ज्वारीच्या लाह्या मंद आचेवर थोडा वेळ भाजून घ्या.
 2. साहित्य..
 3. गार झाल्यावर त्याची मिक्सरमधून पावडर बनवून घ्या.
 4. उकडलेल्या वाटाण्याची पेस्ट करून घ्या.
 5. उकडलेल्या हरभऱ्याची पेस्ट करून घ्या.
 6. सगळे तयार आहे
 7. आता एका भांड्यात ज्वारीच्या लाह्यांची पावडर, वाटाण्याची पेस्ट, हरभऱ्याची पेस्ट, लसूण हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट,सगळे कोरडे मसाले ,मीठ घालून मिश्रण छान मळून घ्या.
 8. आता छोटे गोळे करून आवडीचे आकार द्या.
 9. नॉनस्टिक तव्यावर तेल गरम करा.
 10. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
 11. ज्वारीच्या लाह्यांचे हेल्दी बाईट्स तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर