Photo of Curd Rice by Susmita Tadwalkar at BetterButter
1285
4
0.0(0)
0

दही भात

Feb-05-2019
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही भात कृती बद्दल

दही भाताचे गुणधर्म सर्वांनाच माहिती आहेत. पोटासाठी थंडावा देणारा आणि पौष्टिक मूल्य देणारा असा हा दहीभात!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजवून गार केलेला दोन वाटी भात
  2. २ वाट्या दही
  3. एक मोठा चमचा तेल
  4. मोहरी हिंग आणि जिरे प्रत्येकी पाव चमचा
  5. एक दोन हिरव्या मिरच्या
  6. दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या
  7. चार-पाच कढीपत्त्याची पाने
  8. थोडेसे आले
  9. चवीनुसार मीठ
  10. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. आवडत असल्यास एक चमचा उडीद डाळ
  12. सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे
  13. एक-दोन सांडगी मिरच्या

सूचना

  1. शिजवलेला भात गार करून घ्यावा
  2. थोडा हाताने कुस्करून घ्यावा
  3. आता त्यात थोडे आले किसून व मीठ घालावे
  4. दही घालून मिसळून घ्यावे
  5. सर्व नीट मिसळून घ्यावे
  6. फोडणीसाठी तेल गरम करावे
  7. आता त्यात मोहरी जिरे हिंग लाल सुक्या मिरच्या व हिरवी मिरची व कढीपत्त्याची पाने घालावीत
  8. कढीपत्त्याची पाने कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करावा
  9. आवडत असल्यास कोथिंबीरही फोडणी घालून शकता
  10. आता सर्व हलक्या हाताने मिसळून घ्या
  11. थोडे डाळिंबाचे दाणे घालून सजावट करा
  12. दहीभात तयार!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर