मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याचा पराठा

Photo of Radish roti by Susmita Tadwalkar at BetterButter
27
5
0.0(0)
0

मुळ्याचा पराठा

Feb-05-2019
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याचा पराठा कृती बद्दल

पोटभरीचा आणि चविष्ठ असा हा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक मोठा मुळा
  2. दोन वाट्या कणीक
  3. पाव चमचा ओवा
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. दोन चमचे तूप
  6. थोडेसे तेल
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

सूचना

  1. कणकेमध्ये मीठ घालून कणीक पोळीसाठी भिजवतो तशी भिजवून घ्या
  2. मुळा किसून घ्या व त्यातील पाणी काढून टाका
  3. मुळ्याच्या किसामध्ये मीठ, ओवा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिंबीर घाला
  4. सगळं नीट हलक्या हाताने मिसळून घ्या
  5. आता कणकेचा छोटा गोळा घेऊन एक पोळी लाटा व बाजूला ठेवा
  6. आणखीन एक पोळी लाटून घ्या
  7. आता या पोळीवर मुळ्याचे मिश्रण पसरवा
  8. आधी लाटलेली पोळी या पोरीवर टाकून पोळीच्या कडा बंद करा
  9. थोडी हलक्या हाताने पुन्हा लाटा
  10. ही डबल पोळी तव्यावर टाका
  11. दोन्ही बाजूने तूप सोडून छान भाजून घ्या
  12. गरमागरम पराठादही आणि चटणीसोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर