मुख्यपृष्ठ / पाककृती / हरेभरे उकडीचे वडे

Photo of Harebhare Ukdiche Vade by Vaishali Joshi at BetterButter
128
9
0.0(0)
0

हरेभरे उकडीचे वडे

Feb-05-2019
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरेभरे उकडीचे वडे कृती बद्दल

ह्या रेसिपीतल सर्व घटक पोषक तर आहेच त्याचबरोबर हे उकडीचे असल्यामुळे आणखिनच प्रकृतीला उत्तम .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

 1. मोड आलेले हिरवे मूग १ कप
 2. ताजे हिरवे हरबरे १ कप
 3. हिरव्या मिरच्या ३-४
 4. कोथिंबीर
 5. लसूण पाकळ्या ७-८
 6. जिरे १/२ चमचा
 7. बडी शोप १ टिस्पून
 8. धणे पावडर १/२ चमचा
 9. पुदिन्याची पाने १०-१२
 10. तेल २ टिस्पून
 11. राई
 12. हिंग
 13. चीलिफ्लेक्स

सूचना

 1. हिरवे मूग नेहमी प्रमाणे भिजवून घेऊन , नंतर त्याला मोड आणून घ्यावे
 2. मोड आलेले मूग , हरबरे , हिरव्या मिरच्या , लसूण पाकळ्या , कोथिंबीर पाण्याने धुऊन घ्यावे
 3. त्यात जिरे घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे
 4. आता त्यात हिंग , धणे पावडर , १ चमचा तेल , पुदिन्याची पाने हाताने तोडून , मिठ चवीनुसार आणि बडी शोप घालून सगळ छान मिक्स करून घ्यावे
 5. हातावर मध्यम आकाराचे गोळे करून त्याचे वडे करून घ्यावे
 6. इडली पात्रात १५-२० मिनिटे वाफवून घ्यावेत
 7. शिजलेत का ते चेक करा आणि गॅस बंद करून थंड झाल्यावर सर्व वडे एक प्लेट मध्ये काढून घ्यावे आणि त्यावर तेल , राई , ठोडे चीलीफ्लेक्स आणि हिंग घालून केलेली फोडणी घालावी
 8. बस खाण्यासाठी तयार हरेभरे उकडीचे वडे आवडीनुसार सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर