मुख्यपृष्ठ / पाककृती / Ragi Sandwich Dhokla

Photo of Ragi Sandwich Dhokla by Archana Chaudhari at BetterButter
284
6
0.0(1)
0

Ragi Sandwich Dhokla

Feb-06-2019
Archana Chaudhari
1080 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • मध्यम
 • ब्लेंडींग
 • बॉइलिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. ढोकळ्यासाठी
 2. नाचणी १ कप
 3. ब्राउन तांदूळ १/२ कप
 4. उडीद डाळ १/२ कप
 5. इनो सॉल्ट १/२ टीस्पून
 6. मीठ चवीनुसार
 7. सँडविच चटणीसाठी
 8. वाटणे १ कप
 9. जिरे १/२ टीस्पून
 10. हिरवी मिरच्या २
 11. लिंबू रस २ टीस्पून
 12. कोथिंबीर १/२कप चिरून
 13. मीठ चवीनुसार
 14. तेल १/४ टीस्पून
 15. फोडणीसाठी
 16. तेल २ टीस्पून
 17. हिरवी मिरची १ तिरकी कापून
 18. तीळ १/२ टीस्पून
 19. मोहरी १ टीस्पून
 20. हिंग १/२ टीस्पून

सूचना

 1. नाचणी, ब्राउन तांदूळ, उडीद डाळ वेगवेगळे धुवून घ्या.
 2. ६ तास वेगवेगळे भिजत ठेवा.
 3. मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक पेस्ट बनवून घ्या नंतर एकत्र करा.
 4. १२ तास झाकून आंबविण्यासाठी ठेवा.
 5. ढोकळ्याचे मिश्रण तयार आहे.
 6. आता सँडविच चटणीसाठी,एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे,मिरची टाका, वाटणे टाकून ५ मिनिटे झाकून ठेवा.
 7. गार झाल्यावर कोथिंबीर,मीठ,लिंबू घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या.
 8. आता ढोकळा बनविण्यासाठी मिश्रणाचे दोन बहाग करा .
 9. वाफविण्यासाठी पाणी गरम करायला ठेवा.
 10. मिश्रणाच्या एका भागात १/२ इनो सॉल्ट टाकून तेल लावलेल्या भांड्यात ठेवा.
 11. १० मिनिटे वाफावल्यावर त्यावर हिरवी चटणी पसरवा.
 12. वरून राहिलेल्या मिश्रणात १/२ इनो सॉल्ट टाकून,वरील चटणीवर टाका.
 13. पुन्हा १० ते १५ मिनिटे वाफवा.
 14. फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी,हिंग,मिरची,तीळ घाला.
 15. गार झाल्यावर वरील सँडविच ढोकळ्यावर पसरवा.
 16. सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree Bhawalkar
Feb-11-2019
Jayshree Bhawalkar   Feb-11-2019

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर