मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदूळ व मिश्र डाळी चा ढोकळा

Photo of Rice & mix grains dhokla by Jyoti Katvi at BetterButter
711
4
0.0(0)
0

तांदूळ व मिश्र डाळी चा ढोकळा

Feb-07-2019
Jyoti Katvi
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदूळ व मिश्र डाळी चा ढोकळा कृती बद्दल

हेल्दी नाष्टा काय करावा की ज्या मध्ये तेल तूप नसेल व तिखट नसेल. मग बनवला हा ढोकळा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 3 वाट्या तांदूळ व 1 वाटी उडीद डाळ
  2. एक वाटी सर्व प्रकारच्या डाळी (मूगडाळ,चणा डाळ ,मसूर डाळ, तूरडाळ )
  3. मीठ

सूचना

  1. तांदूळ व सर्व डाळी वेगळे वेगळे 4 तास भिजवून ठेवा
  2. भिजलेल्या तांदूळ व उडीद डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून ठेवा.
  3. इतर डाळी सुध्दा जाडसर वाटून घ्या
  4. तांदूळ व उडीद डाळीचे मिश्रण एकत्र घोटून 6 तास फुगण्यासाठी ठेवा
  5. इतर डाळीचे मिश्रण सुध्दा एकत्र घोटून 6 तास फुगण्यासाठी ठेवा
  6. दोन्ही मिश्रण चांगल फुगले की त्यात मीठ घालून वेगवेगळेा मस्त घोटून घ्या
  7. इडली पात्र किंवा मोदक पात्र पाणी घालून गँस वर ठेवा
  8. एका खोलगट थाळीला तेलाचा हात फिरवून त्यात तांदूळ व उडीद डाळीचे मिश्रण टाका व मोदक पात्रात उकडण्यासाठी ठेवा
  9. 10/15 मिनिटे झाली की मोदक पात्राचे झाकण काढून तांदूळ व उडीद डाळीचे ढोकळा तयार झाला की पहा.
  10. नंतर तयार सफेद (तांदूळ व उडीद डाळ ) ढोकळ्यावर मिश्र डाळीचे मिश्रण पसरवायचं व झाकण लावून 15 मिनिटे वाफवून घ्या.
  11. झाकण काढून ढोकळा थाळी बाहेर काढून सुरीने मस्त काप करा ढोकळा खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर