मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराठे स्टफ सोया चना

Photo of Methi parathe stuff soya chana by seema Nadkarni at BetterButter
750
3
0.0(0)
0

मेथी पराठे स्टफ सोया चना

Feb-07-2019
seema Nadkarni
100 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराठे स्टफ सोया चना कृती बद्दल

सोयाबीन ची वडी हि खूपच पौष्टिक असते, चना डाळ पण प्रोटीन युक्त आहे. व मल्टी ग्रेन आटा व मेथी ची भाजी वापरले असल्याने हि पाक कृती हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • स्टर फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कप सोयाबीन ची वडी
  2. 1/4 कप चना डाळ
  3. 1 कप बारीक चिरलेली मेथी
  4. 2 चमचा आले लसुण बारीक चिरलेले
  5. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  6. 1 चमचा लाल तिखट
  7. चवी पुरते मीठ
  8. 1/4 टि स्पून हळद
  9. 1/2 चमचा आमचूर पावडर
  10. 1/4 टि स्पून तीळ
  11. 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 1-2 हिरव्या मिरच्या
  13. 2 कप मल्टी ग्रेन आटा
  14. 1 ग्लास पाणी
  15. फोडणी साठी तेल

सूचना

  1. सौ प्रथम सोयाबीन ची वडी व चना डाळ गरम पाण्यात 1/2 तास भिजत ठेवा.
  2. सोयाबीन ची वडी पाण्यातून बाहेर काढून पाणी दाबून काढावे. मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या घालून पेस्ट तयार करावी.
  3. चना डाळ पण कुकर मध्ये बुडेल इतके पाणी व थोडी हळद घालून 2-3 शीट्या काढावीत. जास्त पाणी घालू नये.
  4. . मल्टी ग्रेन आटा मध्ये थोडे मीठ व 1/2 चमचा तेल, हळद, 1/4 टि स्पून लाल तिखट, बारीक चिरलेली मेथी घालून घालून कणीक भिजवून घ्या.
  5. एका कढईत तेल तापवून त्यात जीरे ची फोडणी करून त्यात तीळ, कडीपत्ता, बारीक चिरलेले आले लसुण घालून फोडणी करावी.
  6. त्यात बारीक चिरलेला कांदा, सोयाबीन ची पेस्ट, शिजवून घेतलेली चण्याची डाळ घालावी. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, धणे जिरे पावडर, आमचूर पावडर घालून एकत्र करावे.
  7. मसाले घालून एकत्र करून मिश्रण कोरडे होईस्तोवर परतावे.
  8. आता मिश्रण थंड झाल्यावर मेथी च्या कणीके चे गोळे तयार करून घ्या. त्यात वरील सोयाबीन - चण्याचे सारण भरून घ्यावे.
  9. हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावे.
  10. तव्यावर दोन्ही बाजूला थोडे तेल लावून कुरकुरीत होईपर्यंत परतावे.
  11. हे पराठे दही सोबत चविष्ट लागतात व शरीरा साठी पौष्टिक आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर