मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टीक मेथी, कोबी, गाजर मुठीया

Photo of Fenugreek leaves, Cabbage, Carrot Rolls by SUCHITA WADEKAR at BetterButter
40
3
0.0(0)
0

पौष्टीक मेथी, कोबी, गाजर मुठीया

Feb-08-2019
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टीक मेथी, कोबी, गाजर मुठीया कृती बद्दल

आजच्या जेवणातील पौष्टीक पदार्थ म्हणजे मेथी, कोबी, गाजर मुठीया.... मेथी मुठीया बनवत असताना मनात विचार आला यात कोबी आणि गाजर ऍड करावे का ... आणि लगेच अंमलबजावणी केली.. कारण गाजर आणि कोबी दोन्हीही घरी होते... मस्त झाले. मुलांना अतिशय आवडते आणि भाज्या व तिन्ही पिठांमुळे याची पौष्टीकताही वाढते. हेल्दी आणि पोटभरीचा पर्याय म्हणजे हे मुठीया. नक्की try करून बघा ...

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. गव्हाचे पीठ 1 वाटी
 2. बेसनपीठ 1 वाटी
 3. तांदूळ पीठ 1 वाटी
 4. मेथी बारीक चिरून 2 वाटी
 5. कोबी बारीक चिरून 1वाटी
 6. गाजर किसून अर्धी वाटी
 7. हिरवी मिरची 5-6
 8. जिरे 1 चमचा
 9. तिळ 4 चमचे
 10. धनापावडर 1 चमचा
 11. अर्ध्या लिंबाचा रस
 12. मीठ आवश्यकतेनुसार
 13. हिंग 1अर्धा चमचा
 14. हळद अर्धा चमचा
 15. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

 1. प्रथम एका घमेल्यात गव्हाचे पीठ, बेसनपीठ आणि तांदूळ पीठ घ्यावे.
 2. फोटोत दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या चिरून तयारी करून घ्यावी.
 3. मिरची, लसूण, जिरे, मीठ यांचे वाटण करावे
 4. पिठामध्ये हिंग, हळद, तीळ, हिरव्या मिरचीचे वाटण, धनापावडर घालावे
 5. नंतर मेथी, कोबी, गाजर या चिरलेल्या भाज्या घालाव्यात
 6. लिंबू पिळावे
 7. 2 चमचे तेल घालून सर्व एकत्र करून आवश्यक तेवढे पाणी वापरून गोळा माळवा
 8. तयार झालेल्या गोळ्याचे रोल करून चाळणीवर 20 मिनिटे वाफवून घ्यावे
 9. वाफवल्यावर असे दिसतील, याच्या वड्या कापाव्यात आणि एका कढईत 4 चमचे तेल तापवून 2 चमचे तीळ घालावेत व कापलेल्या वड्या घालाव्यात आणि चांगले परतावे.
 10. आपली मेथी, कोबी, गाजर मुठीया तैय्यार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर