मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग डाळ आणि चंदन बटवा ची आमटी

Photo of MOONG DAL & BATHUA by Anil Pharande at BetterButter
19
2
0.0(0)
0

मूग डाळ आणि चंदन बटवा ची आमटी

Feb-08-2019
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डाळ आणि चंदन बटवा ची आमटी कृती बद्दल

पौष्टिक आमटी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. चंदन बटवा भाजी एक गड्डी
 2. मूग डाळ अर्धा कप
 3. लसूण 10 ते 12 पाकळ्या
 4. टोमॅटो 1 मध्यम आकाराचा
 5. हळद अर्धा चमचा
 6. कांदा लसूण मसाला 1 टीस्पून
 7. मीठ चवीप्रमाणे
 8. तेल 1 टेबलस्पून
 9. जिरे 1 टीस्पून

सूचना

 1. चंदन बटवा भाजीची फक्त पाने खुडून घ्या व स्वच्छ मिठाच्या पाण्याने व साध्या पाण्याने धुवून घ्या
 2. कुकरमध्ये धुवून घेतलेली मूग डाळ व भाजीची पाने आणि थोडे पाणी घाला व 2 ते 3 शिट्ट्या देऊन भाजी व डाळ शिजवून घ्या
 3. कढईमध्ये तेल गरम करा व जिरे घाला
 4. ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला व गुलाबी रंगावर परतून घ्या
 5. चिरलेला टोमॅटो घाला व मऊ होईपर्यत शिजू द्या
 6. हळद घाला व अर्धा मिनिट परतून घ्या.
 7. कांदा लसूण मसाला घाला व परतून घ्या
 8. शिजलेली डाळ व भाजी घाला व मिक्स करा
 9. मीठ घाला व अजून थोडे पाणी घाला, झाकण लावून उकळी येऊ द्या
 10. गरमागरम ज्वारीच्या भाकरी व गरम भाताबरोबर आमटी व मिरचीचा खर्डा सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर