मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरूच्या पानांचा आरोग्यदायी चहा

Photo of Helthy Guava leaves Tea by Jayshree Bhawalkar at BetterButter
667
4
0.0(0)
0

पेरूच्या पानांचा आरोग्यदायी चहा

Feb-09-2019
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरूच्या पानांचा आरोग्यदायी चहा कृती बद्दल

पेरू थंडी च्या दिवसात मिळणारा एक अमृत फळ आहे.ह्याचे जेवढे गुण सांगू तेवढे कमी आहे. पेरू हा हृदय मजबूत करतो,डोळ्यांची ज्योती वाढवतो,पचनशक्ती वाढवितो,त्वचा तजेलदार बनवितो,मधुमेह नियंत्रित ठेवतो,कँसर पासून बचाव करतो आणि रोग्यप्रतिरोधक शक्ती वाढविण्यात मदद करतो.ह्यात लौह,झिंक,विटामिन -A, E, B-6 आणि फोलेट पण प्रचुर मात्रा मधे असत .अस हे थंडीत ले अमृत फळ थंडीत उन्हात बसून जरूर खावे म्हणजे विटामिन D सुध्दा प्रचुर मिळेल. हा चहा आम्ही ताज्या पानांन पासून आणि वाळलेल्या पानांच्या पावडरी पासून बनवू शकतो .पेरू ची हिरवी पाननीट धुवून पाणी पुसून सावलीत वाळवून हातानेच चुरून पावडर करून हवाबंद डब्यात ठेवा. मी इथे दोन्ही विधी सांगत आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 6 ताजे हिरवे पेरू ची पानं /1 मोठा चमचा वाळलेल्या पानांची पावडर
  2. 1/2 लिटर / 2 कप पाणी
  3. 1/2 चमचा लिंबाचा रस
  4. 1 चमचा मध /शहद (आवश्यक नाही)

सूचना

  1. .सर्व साहित्य एकत्र ठेवा
  2. आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा
  3. पाणी उकळल्यावर त्यात पेरू ची पाने घालून उकळून द्या
  4. पाणी अर्ध होई पर्यंत 5-7 मिनटं उकळी येऊ द्या गॅस बंद करा
  5. आता झाकून ठेवा म्हणजे पानातील सत्व पाण्यात रुजतील
  6. एका काचेच्या कपात लिंबाचा रस,मध (हवा असेल तरच) घाला
  7. आता ह्यात पेरू चा चहा गाळून घ्या
  8. आपला आरोग्यदायी पेरू च्या पानांचा चहा लिंबाच्या फोडीनी पेरूच्या पान आणि फोडीनींनी सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर