मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा म्हैसूरपाक

Photo of Gulacha Mhaisurpak by Vaishali Joshi at BetterButter
582
8
0.0(0)
0

गुळाचा म्हैसूरपाक

Feb-10-2019
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा म्हैसूरपाक कृती बद्दल

अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने हा म्हैसूरपाक मी गूळाचा केलाय. आज वसंत पंचमीच्या निमित्ताने सरस्वती देवीला पिवळा नैवेद्य दाखवला .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन १/२ वाटी
  2. साजूक तूप १/२ वाटी
  3. गुळ १/२ वाटी
  4. वेलची पावडर १/४ चमचा
  5. ड्राय फ्रूट सजावटीसाठी
  6. दुध १/४ छोटा कप

सूचना

  1. गॅस वर कढई तापत ठेवा व मंद आचेवर बेसन हलकासा रंग बदले पर्यंत परतून घ्या
  2. पूर्ण साजूक तूप घालून बेसन गुलाबीसर होईस्तोवर परतावे
  3. गुळ घालून तो वितळला कि त्यात हाताने थोडे थोडे दूध शिंपडावे व परतत राहावे
  4. जसे जसे दुध शिंपडू तसे तसे मिश्रण फुलूुन वर येत आणि हलकं होऊन जाळीदार होईल , वेलची पावडर घालून मिक्स करा आणि
  5. लगेच तुप लावलेल्या थाळीत मिश्रण ओता व सेट होऊ द्या
  6. थंड झाल्यावर चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या आणि ड्राय फ्रूट घालून सजवा
  7. खायला तयार गुळाचा म्हैसूर पाक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर