Photo of Daliya Upma by Susmita Tadwalkar at BetterButter
1686
5
5.0(0)
0

Daliya Upma

Feb-11-2019
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. थोडा जाडसर दलीया
  2. १ बारीक चिरलेला कांदा
  3. १/२ वाटी बारीक चिरलेले गाजर
  4. १/२ वाटी मटार
  5. २-३ हिरव्या मिरच्या
  6. ५-६ कढीपत्त्याची पाने
  7. २ चमचे तेल
  8. फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. लिंबू

सूचना

  1. दलिया दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये २ शिट्या करून शिजवून घ्या
  2. शिजलेला दलिया गार करून घ्या
  3. कढईमध्ये तेल गरम करा व मोहरी हिंग हळद घालून फोडणी तयार करा
  4. हिरवी मिरचीचे तुकडे व कढीपत्ता घाला
  5. बारीक चिरलेला कांदा घाला
  6. कांदा परतून झाल्यावर त्यात मटार आणि गाजराचे तुकडे घाला
  7. झाकण ठेवून वाफ आणा
  8. आता त्यात शिजलेला दलिया घाला व नीट परता
  9. मीठ घालुन नीट मिसळा
  10. चांगली वाफ आणा
  11. गरमागरम दलिया कोथिंबीर व लिंबू पिळून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर