मुख्यपृष्ठ / पाककृती / तुळशी काढा / हर्बल टी

Photo of Tulsi Kadha / Herbal Tea by Renu Chandratre at BetterButter
1610
5
0.0(0)
0

तुळशी काढा / हर्बल टी

Feb-13-2019
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुळशी काढा / हर्बल टी कृती बद्दल

मोसम बदलला की सर्दी, खोकला, घसा कोरडा होणे, ताप असे आजार सुरू होतात । तेव्हां हा तुळशी चा काढा करून ठेवला आणि दिवस भर थोडा थोडा घेतला की लगेच आराम होतो, आणि हा काढा नियमित सेवन केल्यास रोग प्रतिरोधक शक्ती वाढते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तुळशी ची पाने 10-15
  2. हळद 1/2 चमचा
  3. आले 1 लहान तुकडा
  4. लवंग 4
  5. काळी मिरी 4
  6. दालचिनी चा तुकडा 1
  7. गूळ 1 चमचा
  8. मध/ शहद 1-2 चमचे गरजेनुसार
  9. हिरवी वेलची 1
  10. पाणी 1 ग्लास

सूचना

  1. सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करावे
  2. तुळशीचे पाने, आले, लवंग आणि काळी मिरी कुटून घ्यावे
  3. पाणी उकळत ठेवावे, त्यात कुटलेली तुळशी, लवंग, मिरी , आले, हळद पावडर, वेलची, आणि दालचिनी टाकून ,मंद आचेवर 5-10 मिनिटे उकळी काढावी।
  4. तुळशी काढा तयार आहे, आता हा चहाच्या गाळण्याने गाळून घ्यावे।
  5. आवडीनुसार थोडे मध घालून , गरम गरम प्यायला द्या। लगेच आराम पडतो आणि शांत झोप लागते।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर