मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्यांच्या धिरड्याची फ्रांकी रोल

Photo of Mix spraouts chilla fraky roll by Anita Bhawari at BetterButter
256
5
0.0(0)
0

कडधान्यांच्या धिरड्याची फ्रांकी रोल

Feb-16-2019
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्यांच्या धिरड्याची फ्रांकी रोल कृती बद्दल

कडधान्य कमीत कमी मसाले व तेल वापरून अगदी चविष्ट पोष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत संघांना आवडणारी हेल्दी फ्रांकी रोल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चवळी मटकी मुग मसूर रात्रभर पाण्यात भिजवलेले थोडस मोड आलेले कडधान्य
  2. कांदा टोमॅटो सिमला मिरची काळी मिरी पूड लिंबू रस काळं मीठ चाट मसाला
  3. तांदूळ पीठ एक वाटी
  4. बेसन पीठ अर्धी वाटी
  5. ज्वारी पीठ दोन चमचे
  6. चिंचगूळाची चटणी
  7. कोथिंबीर पुदिना तिखट चटणी
  8. पाणी
  9. मीठ
  10. एक छोटा चमचाभर तेल
  11. बारीक पिवळी शेव
  12. चीज
  13. हळद
  14. जिरे लसूण हिरवी मिरची कोथंबीर

सूचना

  1. भिजवलेले कडधान्य घ्या थोडेसे मोड आलेले
  2. मिक्सरमधून कडधान्य कांदा लसूण हिरवी मिरची कोथंबीर पाणी घालून मिश्रण वाटून घ्या
  3. अशाप्रकारे पातळसर वाटून घ्या
  4. एका वाडग्यात वाटलेले मिश्रण तांदूळ पीठ बेसन पीठ ज्वारीचे पीठ जिरं हळद मीठ घालून मिश्रण धिरड्याप्रमाणे पातळसर करून घ्या
  5. अशा प्रमाणे पाणी घालून पातळ करून घ्या
  6. ब्रशने तव्यावर तेल लावून घ्या व धिरडी काढून घ्या
  7. वरतून झाकण ठेवा खाली धिरडे खरपूस होईपर्यंत सात-आठ मिनिटे मंद आचेवर होऊन द्या
  8. कांदा टोमॅटो सिमला मिरची काळी मिरी पावडर लिंबू रस काळ मीठ पुदिन्याची पानं हे सर्व एकत्र करून घ्या
  9. भाजलेले धिरडे प्लेटीत काढून चिंच गुळाची चटणी कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावून घ्या मधोमध टोमॅटो कांद्याचा केलेला साल्सा मधोमध ठेवा वरतून थोडी सी चीज किसून घाला व पिवळी शेव घाला व रोल करून घ्या
  10. आपली कडधान्याचे धिरड्याची फ्रांकी रोल तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर