मुख्यपृष्ठ / पाककृती / "अंडी व भाज्यांचे" पौष्टीक आप्पे ...

Photo of Eggs Appe with Vegetables ... by Suchita Wadekar at BetterButter
44
3
0.0(0)
0

"अंडी व भाज्यांचे" पौष्टीक आप्पे ...

Feb-20-2019
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

"अंडी व भाज्यांचे" पौष्टीक आप्पे ... कृती बद्दल

रोज वेगवेगळ करूनही आज काहीतरी वेगळं बनव असं पालुपद लेकीचं नेहमीच चालू असते... यासाठी केलेला एक वेगळा पण यशस्वी प्रयत्न म्हणजे आजची हि डिश. यात मी घरी ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्यांचा वापर केला आणि एक वेगळा प्रयत्न म्हणून आप्पे पात्रात हे आप्पे बनवले आणि अतिशय सुंदर झाले . हे नुसते सॉस सोबतही चांगले लागतात आणि पोळीसोबत सुद्धा ..:ok_hand: सगळ्या भाज्या आणि अंड्यातील प्रोटीन हि मिळते. लेकीला अतिशय आवडले ... त्यामुळे लेकभी खुश आणि लेकीची आईहि खुश ...

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. अंडी 3
 2. कांदा बारीक चिरलेला
 3. गाजर किसून घ्यावे
 4. कोबी बारीक चिरून घेणे
 5. कोथिंबीर
 6. हिरवी मिरची बारीक चिरलेली आवधकतेनुसार
 7. मीठ आवश्यकतेनुसार
 8. तेल

सूचना

 1. सर्व भाज्या चिरून एका डिशमध्ये सगळी तयारी करून घ्यावी.
 2. एका भांड्यात 3 अंडी फेटून त्यात चिरलेल्या सर्व भाज्या .. कांदा, गाजर, कोथिंबीर, कोबी, हि. मिरची आणि मीठ घालावे.
 3. हे सर्व एकत्र करावे ... असे दिसेल.
 4. हे मिश्रण चमच्याने आप्पे पात्रात घालावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी .
 5. 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून आप्पे पलटी करावेत
 6. दोन्ही बाजूने मस्त खमंग भाजून घ्यावेत
 7. सॉस आणि पोळीसोबत सर्व्ह करावेत अंड्याचे पौष्टीक आप्पे ...
 8. पोळीसोबत ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर