मुख्यपृष्ठ / पाककृती / हरीभरी पालक खिचड़ी

Photo of Palak khichdi by Rupa Thaker at BetterButter
812
2
0.0(0)
0

हरीभरी पालक खिचड़ी

Feb-21-2019
Rupa Thaker
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरीभरी पालक खिचड़ी कृती बद्दल

पौष्टिक आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३०० ग्रॅम पालक
  2. २ टोमैटो
  3. २ कांदे
  4. ४-५ लसुन पाकळ्या
  5. १ वाटी तांदुळ
  6. १/२ वाटी सालंवाली मुगडाळ
  7. १/२ चमचा हळद पावडर
  8. १/२ चमचा लाल मिरची पावडर
  9. १ चमचा जिरे
  10. ५ चमचा तुप
  11. चिमुट भर हींग
  12. चविनुसार मिठ
  13. आवश्यकतेनुसार पाणी

सूचना

  1. प्रथम एकांकी भांड्यात डाळ- तांदुळ ,मिक्स करुन ते स्वच्छ पाण्याने धुवुन घेणे, कुकर मध्ये २ चमचा तुप टाकुन त्यामध्ये जिरे- हींग घालुन दाळ-तांदुळ घाला , वरुन मिठ, हळद व १ ग्लास पाणी घालुन मध्यम आचेवर ४ शिट्या देवुन शिजवुन घ्यावे
  2. दुसरी कडे साफ केलेला पालक स्वच्छ धुवुन गरम पाण्यात वाफवुन मिक्सरला त्याची चांगली प्युरी बनवुन घ्या
  3. नंतर १ कांदा, २ टोमैटो, २ लसुन पाकळ्या आणी १ १ मिरची हे सगळे एकत्र मिक्सरला वाटुन याची पेस्ट बनवुन घ्या
  4. एक नोन स्टिक पेन मध्ये ३ चमचा तुप टाकुन त्यामध्ये ३ लसुन पाकळ्या बारीक चिरुन, १/२ चमचा जिले, हींग, १ बारीक चिरलेला कांदा- टोमैटो पेस्ट, पालक प्युरी व वरील उरलेले सर्वे मसाले घालुन २ मिनटे शिजवुन घ्या
  5. शेवटी तयार खिचड़ी घालुन चांगले मिक्स करा व गरम गरम हरी भरी पालक खिचड़ी पापड़ आणी कोशिंबीर सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर