मुख्यपृष्ठ / पाककृती / मिसळपाव

Photo of Misalpav by Jyoti Katvi at BetterButter
38
2
0.0(0)
0

मिसळपाव

Feb-23-2019
Jyoti Katvi
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळपाव कृती बद्दल

आज शनिवार हाफ डे मग काय मुलाची फर्माइश काय तर आज मिसळपाव बनवण्याची आणि बनली सुध्दा तुमच्या बरोबर शेअर करते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. मोड आलेली मटकी पाव किलो
 2. कांदा चार पाच
 3. टोमॅटो तीन
 4. आले लसूण मिरची व कोथिंबीर
 5. ओले खोबरे छोटा तुकडा
 6. काश्मिरी मिरची पूड दोन चमचे
 7. मिसळपाव मसाला तीन चमचे
 8. तेल तीन चमचे
 9. मीठ चवीनुसार
 10. पाव व फरसाण

सूचना

 1. मटकी साफ करून धुवून घ्या
 2. कुकरमधे मटकी मीठ व हळद पाणी घालून एक शिट्टी काढून घ्या
 3. एक शिट्टी घेऊन गॅसु बंद करून कुकर थंड होऊ द्या
 4. कुकर थंड होईस्तो कांदा टोमॅटो मिरची आले व खोबरे कापून घ्या
 5. कापलेले जिन्नस तव्यावर थोडे परतवून घ्या
 6. तव्यावर परतल्यावर थंड करून मिक्सरवर बारिक वाटून घ्या
 7. कुकर थंड झाला की मटकी शिजली का ते पहा
 8. आता कढईत दोन तीन चमचे तेल गरम करून घ्या
 9. तेल गरम झाले की वाटलेले मिश्रण टाका व तेल सुटे पर्यंत परतवून घ्या
 10. मग त्यात मीठ मिरची पूड व मिसळपाव मसाला घालून परतवून उकडलेली मटकी टाका व चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. शेवटी चिरलेली कोथींबीर टाकून मिसळ तयार .
 11. खाण्यासाठी तयार मिसळ पाव चिरलेला कांदा व फरसाण टाकून वरून लिंबू पिळून पावा बरोबर खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर