मुख्यपृष्ठ / पाककृती / खिमा वडे ...

Photo of Smashed Chicken Wade by Suchita Wadekar at BetterButter
49
2
0.0(0)
0

खिमा वडे ...

Feb-24-2019
Suchita Wadekar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिमा वडे ... कृती बद्दल

चिकन हा प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी ३ असून कर्करोगाशी लढण्याची क्षमता देते. चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अनेक प्रकारचे मिनरल्स असतात.  #खिमा_वडे ... खिमा वडे मी माझ्या सासुबाईंकडून शिकले .... माझ्या सासूबाई मूळच्या मुरुडच्या. चार भाऊ आणि त्या स्वतः अशी ती पाच भावंड ... त्यामुळे माहेरी त्या सगळ्यांच्या खूप लाडक्या ..... त्याकाळी त्या मॅट्रिक पास झाल्या होत्या.... हुशार तर होत्याच पण आधुनिक विचारसरणीच्या होत्या ... वाचनाची त्यांना आवड होती. अगदी निगुतीने संसार केला त्यांनी म्हणजे सर्वकाही पोटभर परंतु अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली. सासूबाई चेहऱ्यावरून, बोलण्यातून त्या जरी कडक वाटल्या तरी मनाने प्रेमळ आणि सरळ होत्या. स्वच्छता .. टापटीप.. वक्तशीरपणा ... आणि थोड्या कडक वाटल्या तरी अचानक कोणी जेवायच्यावेळी घरी आले तर जेवल्याशिवाय जात नसे. त्या मुळच्या मुरुडच्या असल्यामुळे बुधवार, शुक्रवार, रविवार ... ओली-सुकी मासळी, चिकन - मटणचे प्रकार घरी बनवले जात असत ... मासळीचे सर्व प्रकार त्यांना येत असत .. सुरमई .. पॉपलेट .. ओले बॉंबिल... कोळंबी ... कालवं .. शिंपले .. चिंबोरी(खेकडे) ... सुकी मच्छी .. सुकट.. सोडे .. बॉंबिल सर्वकाही त्या स्वतः बनवायच्या ... अशाप्रकारे त्यांच्याकडून मी देखील यातले बरेचसे प्रकार शिकले ... त्यापैकीच हे एक ... 'खिमा वडे'.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. ◆ सारणासाठी साहित्य -
 2. चिकन किंवा मटण खिमा अर्धा किलो
 3. कांदे 2 बारीक चिरून
 4. आले 1 इंच
 5. लसूण 7ते8 पाकळ्या
 6. कोथिंबीर
 7. खोबरे किस अर्धी वाटी
 8. हिंग अर्धा चमचा
 9. हळद 1 चमचा
 10. मीठ आवश्यकतेनुसार
 11. तेल आवश्यकतेनुसार
 12. लाल तिखट 2 चमचे
 13. काळा मसाला अथवा चिकन मसाला 4 चमचे
 14. ◆ खिमा कव्हर -
 15. अर्धा किलो बटाटे
 16. हिरवी मिरची 4
 17. आले 1 इंच
 18. कोथिंबीर
 19. मीठ आवश्यकतेनुसार
 20. एक अंडे
 21. 4-5 टोस्ट

सूचना

 1. खिमा सारण - प्रथम तेलामध्ये हिंग, हळद, थोडा बारीक चिरलेला कांदा घालून परतावे आणि त्यात खिमा घालावा व चांगले परतावे.
 2. थोडे पाणी व मीठ घालून शिजवून घ्यावे.
 3. शिजवलेल्या खिम्यातील पाणी काढावे.
 4. एका कढईत तेलावर उरलेलं कांदा परतावा
 5. नंतर यात लाल तिखट, काळा मसाला अथवा चिकन मसाला घालून परतावे
 6. नंतर यात आले, लसूण , कोथिंबीर, खोबरेचे वाटण घालून परतावे व आवश्यकतेनुसार मीठ घालावे कारण खिमा शिजवतानाही मीठ घेतले आहे.
 7. नंतर यात शिजवलेला खिमा घालावा व एक वाफ आणावी .
 8. ● आपले खिमा सारण तैयार झाले
 9. ◆ खिमा कव्हर - बटाटे उकडून घ्यावेत
 10. ते किसणीने किसून घ्यावेत
 11. त्यामध्ये आलं, मिरची, कोथिंबीर, मीठ यांचे वाटण घालावे
 12. आणि मळून घ्यावे
 13. याचे एकसारख्या आकाराचे गोळे बनवावेत
 14. या गोळ्यांची मोदकाप्रमाणे पारी बनवून त्यात खिम्याचे सारण भरावे आणि गोळे बंद करावेत.
 15. एका बाऊल मध्ये एक अंडे फेटून तयार ठेवावे. यानंतर 4-5 टोस्ट मिक्सरला फिरवून त्याचे क्रम्स करावेत.
 16. तयार केलेले हे वडे अंड्यामध्ये बुडवावेत
 17. आणि टोस्टच्या क्रम्स मध्ये घोळवावेत
 18. अशाप्रकारे दिसतील आणि डीप फ्राय करावेत.
 19. आपले खिमा वडे तैयार !
 20. सॉस आणि सॅलेड (कांदा, कोबी - पचोडी) सोबत सर्व्ह करा "खिमा वडे" ....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर