व्हेजिटेबल फ्रॅन्की | Vegetable Frankie Recipe in Marathi

प्रेषक Salma Godil  |  1st Sep 2015  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Vegetable Frankie by Salma Godil at BetterButter
व्हेजिटेबल फ्रॅन्कीby Salma Godil
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6445

1

व्हेजिटेबल फ्रॅन्की recipe

व्हेजिटेबल फ्रॅन्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable Frankie Recipe in Marathi )

 • पोळीसाठी :- मैदा - 2 वाट्या
 • मीठ - आवश्यकतेनुसार
 • तेल - 2 लहान चमचे
 • अर्धा कप पाणी
 • अंडे - 1 (मीठ घालून फेटलेले)
 • कटलेटसाठी :- बटाटे - 4 (उकडलेले)
 • भोपळा मिरची - अर्धी (चिरलेली)
 • हिरवे वाटाणे - 1/4 वाटी (शिजवलेले)
 • मक्याचे दाणे - अर्धी वाटी (शिजवलेले)
 • गाजर - अर्धी वाटी (चिरलेले)
 • आले-लसणाची पेस्ट - अर्धा लहान चमचा
 • हिरव्या मिरच्यांची पेस्ट - अर्धा लहान चमचा
 • गरम मसाला - अर्धा लहान चमचा
 • जिरेपूड - 1/4 लहान चमचा
 • चाट मसाला - 1 लहान चमचा
 • मीठ - स्वादानुसार
 • कोथिंबीर - थोडी
 • लिंबाचा रस - 2 लहान चमचे
 • कॉर्नफ्लोर - 2 लहान चमचे
 • तेल - परतण्यासाठी
 • बनविण्यासाठी :- 2 बारीक चिरलेले कांदे
 • कोथिंबीर - अर्धा वाडगा (बारीक चिरलेली)
 • चिंचेचा गर - अर्धा वाडगा
 • चाट मसाला - अर्धा वाडगा
 • चीज - 2 क्युब्स (किसलेले)

व्हेजिटेबल फ्रॅन्की | How to make Vegetable Frankie Recipe in Marathi

 1. पोळी बनविण्यासाठी:- यासाठी सांगितलेले सर्व घटक एकत्र करा आणि मऊ कणिक मळा. पातळ पोळी लाटा आणि तव्यावर अतिशय कमी प्रमाणात भाजा. पोळीच्या एका बाजूला फेटलेले अंडे लावा आणि अंडे शिजेपर्यंत तळा. नंतर त्याला बाजूला व्यवस्थित झाकून ठेवा.
 2. कटलेटसाठी:- बटाटे आणि वाटाणे कुस्करा, त्यात मक्याच्या दाणे, गाजर आणि भोपळा मिरची कुस्करून घाला.
 3. आता यात उरलेले घटक सुद्धा मिसळा आणि लांब आकाराचे कटलेट बनवा. त्यांना थोड्या तेलावर परता आणि बाजूला ठेवा.
 4. बनविण्यासाठी :- अंडे लावलेली पोळी घ्या आणि मध्यभागी कटलेट ठेवा.
 5. नंतर यावर चिंचेचा गर, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला आणि चीज घाला. त्याला घट्ट गुंडाळा. एक टूथपीक लावा किंवा सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळा.
 6. हिरव्या चटणीबरोबर गरमागरम वाढा.

My Tip:

त्या रोल्सना थोडासा सॉस लावा आणि तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये पण भरा.

Reviews for Vegetable Frankie Recipe in Marathi (1)

Gauri Kulkarnia year ago

Nice
Reply