मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टीक नाविन्यपूर्ण तवा-रवा-कॉन ढोकळा ...

Photo of Healthy Innovative Pan-Rava-Corn Dhokla by Suchita Wadekar at BetterButter
25
6
0.0(0)
0

पौष्टीक नाविन्यपूर्ण तवा-रवा-कॉन ढोकळा ...

Feb-28-2019
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टीक नाविन्यपूर्ण तवा-रवा-कॉन ढोकळा ... कृती बद्दल

पौष्टीक तवा-रवा ढोकळा या ढोकल्याला तेल कमी लागते शिवाय रवा हा गव्हापासून बनवलेला असतो त्यामुळेहा ढोकळा हेल्दी तर आहेच शिवाय याप्रकारे इनोव्हेशन केल्यामुळे मुलांना अतिशय आवडतो. शॉर्टब्रेक टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे. एकदा fb वर तवा-रवा ढोकल्याचा व्हिडीओ पाहिला होता... बरेच दिवस झाले करीन म्हणतेय पण जमले नव्हते .. आज माझ्या मुलीला काहीतरी हटके हवे होते... साहित्य फारसे लागत नाही आणि जे लागते ते सर्व घरी होते त्यामुळे करायचे ठरवले पण त्यासाठी मोठा साचा हवा होता तो काही माझ्याकडे नव्हता ... मग आठवले ... पूर्वी माझ्या लेकीसाठी छोटे साचे आणलेले होते ... ते काढले आणि त्यात हे छोटे छोटे र्व ढोकळे बनवले ... आणि काय सांगू ... अतिशय सुंदर झाले :ok_hand:... अप्रतिम !! :thumbsup: तुम्हीही जरूर try करा ... :blush::blush:

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. रवा 1 वाटी
 2. दही 1 वाटी
 3. कॉन अर्धी वाटी
 4. मीठ आवश्यकतेनुसार
 5. साखर 2 चमचे
 6. इनो 1 पॅकेट
 7. मोहरी 1 चमचा
 8. तीळ 1 चमचा
 9. लाल तिखट थोडेसे
 10. तेल आवश्यकतेनुसार
 11. हिरवी चटणी - 2 मिरची+कोथिंबीर+मीठ

सूचना

 1. प्रथम एका भांड्यात रवा चालून घ्यावा
 2. नंतर त्यात दही,कॉन, साखर आणि मीठ घालावे व मिक्स करावे
 3. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करावे .
 4. तयार केलेल्या बॅटर मध्ये इनो पॅकेट घालावे व वरून 2 चमचे पाणी घालावे.
 5. बॅटर चांगले हलवून घ्यावे, इनोमुळे हलके होईल.
 6. नंतर तव्यावर थोडे तेल घालून मोहरी व तीळ घालावेत
 7. नंतर यावर साचे ठेवावेत
 8. या साच्यात तयार बॅटर घालावे व वरून सजावटीसाठी तीळ व लालतिखट घालावे
 9. नंतर यावर झाकण ठेवावे
 10. 5 ते सात मिनिटांनी टूथपिकच्या सहाय्याने चेक करावे
 11. पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजावेत
 12. आपले ढोकळे तैय्यार !
 13. हिरवी चटणी आणि कोथिंबिरींने गारनिशिंग कराव ... "तवा-रवा ढोकळा" !!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर