मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचनी फ्रूट रोल

Photo of Nachani fruit rolls by Rohini Rathi at BetterButter
807
4
0.0(0)
0

नाचनी फ्रूट रोल

Feb-28-2019
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचनी फ्रूट रोल कृती बद्दल

नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते तसेच सर्व फळे ही आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत म्हणून नाचणीचे पीठ व फळांचा ज्यूस वापरून हे रोल बनवले आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खाऊ शकता

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नाचणीचे पीठ एक कप
  2. दूध अर्धा कप
  3. गावरान तूप अर्धा चमचा
  4. सफरचंदांचा रस अर्धा कप
  5. डाळिंबाचा रस अर्धा कप
  6. पेरूचा चा रस( बिया काढून) अर्धा कप
  7. साखर एक चमचा ऑप्शनल आहे
  8. मीठ चवीपुरते
  9. बारीक चिरलेली फळे सफरचंद पेरू व डाळिंबाचे दाणे
  10. ॲल्युमिनियम फाईल पेपर

सूचना

  1. सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून घ्यावे
  2. नंतर त्यात सर्व फळांचा ज्यूस एकत्र करून घ्यावा
  3. फळांच्या रसाला उकळी आल्यानंतर त्यात दूध घालावे
  4. चवीनुसार मीठ साखर (ऑप्शनल आहे) नाचणीचे पीठ ज्यूस मध्ये घालून पिठाची उकड बनवून घ्यावी
  5. मिश्रण एकजीव करून प्लेटमध्ये काढून घ्यावे
  6. नंतर तयार नाचणीच्या पिठाचे ला पाच मिनिटे वाफवून घ्यावे
  7. वाफवलेले पीठ थंड करून त्याचे छोटे गोळे बनवून घ्यावे
  8. ॲल्युमिनियम फाईल पेपर वर तयार गोळा थापून घ्यावा
  9. नंतर त्यात बारीक चिरलेली फळे व ड्रायफ्रूट घालून ॲल्युमिनियम पेपर च्या सहिद त्याचा रोल बनवून घ्यावा
  10. नंतर हलक्या हाताने वरचा अल्युमिनियम पेपर काढून घ्यावा
  11. तयार रोलचे चाकूच्या साह्याने तुकडे करून घ्यावे
  12. सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवून त्यावर ती डाळींबाच्या दाण्याने गार्निशिंग करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर