मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टीग्रेन कांद्याच्या पातीचे स्टीम वडे

Photo of Multigrain kanda pathi che stram vade by Rohini Rathi at BetterButter
766
4
0.0(0)
0

मल्टीग्रेन कांद्याच्या पातीचे स्टीम वडे

Feb-28-2019
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टीग्रेन कांद्याच्या पातीचे स्टीम वडे कृती बद्दल

मिश्र पीठांचा व कांद्याच्या पातीचा वापरून मध्ये मोड आलेली कडधान्य स्टॉप करून तीन केलेले हे वडे खाण्यात खूप स्वादिष्ट व आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे आहेत.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पिठ अर्धाकप
  2. तांदळाचे पीठ दोन चमचे
  3. ज्वारीचे पीठ दोन चमचे
  4. बेसन पीठ दोन चमचे
  5. बाजरीचे पीठ दोन चमचे
  6. बारीक चिरलेली कांद्याची पात अर्धा कप
  7. आले-लसणाची पेस्ट एक चमचा
  8. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन चमचे
  9. ओव्याची पूड एक चमचा
  10. तेल एक चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. फोडणीसाठी
  13. तेल अर्धा चमचा
  14. जिरे अर्धा चमचा
  15. लाल मिरची अर्धा
  16. तीळ दोन चमचे
  17. बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. स्टॉप करण्यासाठी
  19. मोड आलेली कडधान्ये अर्धा कप

सूचना

  1. सर्वप्रथम सर्व पिठे एकत्र करून घ्यावीत
  2. नंतर त्यात ओव्याची पूड हिरव्या मिरचीची पेस्ट आले-लसणाची पेस्ट मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कांद्याची पात एकत्र करून घ्यावी
  3. मिश्रण एकजीव करून पाण्याच्या साह्याने घट्ट पीठ मळून घ्यावे
  4. नंतर मोड आलेली कडधान्य कढाई मध्ये झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे वाफवून घ्यावी
  5. तयार पिठाचे छोटे गोळे बनवून व पारी बनवून वाफवलेले कडधान्यात स्टॉप करावे. ब सर्व बाजूने वडा बंद करून घ्यावा
  6. अशाच प्रकारे सर्व वडे बनवून घ्यावे
  7. कढईमध्ये पाणी गरम करून हॉल असलेल्या ताटाला तेल आणि ग्रीस करून तयार वडे त्यावर ठेवून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे.
  8. वडे थंड करून घ्यावे
  9. नंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून जिरे मा तिळाची ची फोडणी घालून त्यात लाल मिरची पावडर हळद पावडर व बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून तयार वडे त्यात परतून घ्यावे
  10. गरमागरम मल्टीग्रेन पिठाचे स्टीम वडे टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर