मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला ऑम्लेट्स चीज ग्रिल सेन्डविच

Photo of Masala omelet cheese grilled sandwich by seema Nadkarni at BetterButter
582
3
0.0(0)
0

मसाला ऑम्लेट्स चीज ग्रिल सेन्डविच

Mar-02-2019
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ऑम्लेट्स चीज ग्रिल सेन्डविच कृती बद्दल

मुल सन्ध्याकाळी खेळुन आल्यावर कडक भुक लागते. लवकर खायला हवे असत.. त्या मुळे च मला हि झटपट रेसिपी सुचली आणि बनवली आणि फस्त झाली सुद्धा..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 6 स्लाइस ब्रेड ची
  2. 2 अंडी
  3. 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
  4. 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  5. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. चवी पुरते मीठ
  8. 1 चमचा लाल तिखट
  9. 1/4 टि स्पून हळद
  10. 1/2 चमचा काळी मिरी पावडर
  11. 2 चमचा चाट मसाला
  12. 1 वाटी किसलेले चीज
  13. 1/2 कप कोथिंबीर ची चटणी
  14. 1/2 कप मेयोनीज
  15. 1/2 कप बटर

सूचना

  1. सौ प्रथम सगळे लागणारे साहित्य एकत्र करावे.
  2. कोथिंबीर स्वच्छ धुवून. मिक्सर मध्ये मिरची लसुण घालुन चटणी तयार करून घ्या.
  3. कांदा - टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
  4. एका बाउल मध्ये अंड फोडून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिंबीर घालून सवँ करावे. त्यात लाल तिखट, मीठ, काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे.
  5. पेन मध्ये थोडे तेल घालून त्यात ओमलेट तयार करून घ्या.
  6. ओमलेट तयार होत असताना.. एका बाजूला ब्रेड ला मेयोनीज लावून घ्या. दूसरया स्लाइस ला चटणी लावून ठेवावे.
  7. बनवलेले मसाला ओमलेट या स्लाइस वर ठेवावे व त्या वर किसलेले चीज व काळे मिरे पावडर चाट मसाला घालून दुसरी स्लाइस ठेवावे.
  8. तयार झालेली सेन्डविच तव्यावर किंवा सेन्डविच मेकर मध्ये ठेवून बटर लावून ग्रील करून घ्यावे. मि वेळ वाचावा म्हणून ज्या तव्यावर ओमलेट केले त्या वर ग्रील करून घेतले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर