मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज पनीर पुलाव

Photo of veg paneer pulav by supriya padave (krupa rane) at BetterButter
392
2
0.0(0)
0

वेज पनीर पुलाव

Mar-06-2019
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज पनीर पुलाव कृती बद्दल

पटकन होणार व् टेस्टी पुलाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी बासमती तांदूळ
  2. पाव वाटी गाजर
  3. पाव वाटी मटर
  4. एक छोटा कांदा
  5. दोन हिरवी मिरची
  6. एक टेबल स्पून आले लसुन पेस्ट
  7. 100 ग्राम पनीर
  8. अर्धा टेबल स्पून जीरे
  9. 4 लवंग
  10. 4 मिरी दाने
  11. एक छोटा टुकड़ा दालचीनी
  12. एक बड़ी वेलचि
  13. दोन हिरवी वेलचि
  14. दोन तमालपत्र
  15. दोन मोठे चमचे तूप
  16. दीड वाटी गरम पाणी
  17. मीठ

सूचना

  1. कांदा व् गाजर बारिक चिरून घ्या, मटर सोलुन दाने काढून घ्या ,पनीर टुकड़े करुन घ्या
  2. आता कुकर तापत ठेवा त्यात तूप टाकून गरम होउ दया नंतर त्यात जीरे तमाल पत्र मिरी लवंग दालचीनी दोन्ही वेलचि टाकून परतून घ्या
  3. हे चांगले परतले की त्यात कांदा आले लसुन पेस्ट व् हिरवी मिरची टाका
  4. तांदूळ स्वछ धुवून घ्या
  5. तांदूळ मटर गाजर पनीर सर्व एकत्र टाकून नीट मिक्स करून घ्या
  6. आता यात दीड वाटी गरम पाणी व् मीठ टाका व् कुकर चे झाकण लावा
  7. मोठ्या आचेवर एक शिटी दया व् कुकर ठण्ड झाला की पुलाव एकजीव करुन घ्या
  8. पुलाव तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर