मुख्यपृष्ठ / पाककृती / मखानाचे लाडू

Photo of Makhana ladoo by Aarti Nijapkar at BetterButter
1986
6
0.0(0)
0

मखानाचे लाडू

Mar-12-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मखानाचे लाडू कृती बद्दल

मखाना कमळाच्या बियांपासून तयार होतात हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि हे रोजच्या खाण्यात सहसा येत नाही तर ह्याचे लाडू केले तर आवडीने व रोज खाता येतील तर मखाना तूपात खमंग भाजून त्यात इतर साहित्य घालून लाडू बनवणार आहोत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मखाना २५० ग्रॅम
  2. डेसीकेटेड खोबरे ५० ग्रॅम
  3. पीठी साखर १२५
  4. साजूक तूप १०० ग्रॅम
  5. वेलची पूड १/२ लहान चमचा
  6. काजू बदाम पूड १ मोठा चमचा
  7. चारोळी पूड १ लहान चमचा
  8. दूध २ लहान चमचा

सूचना

  1. कढई तापवून मध्यम आचेवर मखाने भाजून घ्या साजूक तूपावर खमंग भाजून घ्या अगदी थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्या
  2. सर्व मखाने भाजल्यावर त्याच कढईत मंद आचेवर डेसीकेटेड खोबरे तूपावर खमंग भाजून घ्या
  3. मखाने व डेसीकेटेड खोबरे थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या
  4. आता एका भांड्यात वाटून घेतलेले मखाने व डेसीकेटेड खोबरे , वेलची पूड, काजू,बदाम,चारोळी ह्यांची पूड व पीठी साखर सर्व एकजीव करून घ्या
  5. गरम करून साजूक तूप घाला व मिश्रण एकत्र करून घ्या त्यात १ ते २ लहान चमचा दूध घालून मिश्रण एकजीव करून मध्यम आकाराचे लाडू घट्ट वळून घ्या
  6. अश्याप्रकारे मखानाचे लाडू तयार हे लाडू हवाबंद बाटलीत किंवा हवाबंद डब्यात ठेऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर