मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेंच फ्राईस

Photo of French Fries by Vaishali Joshi at BetterButter
38
4
0.0(0)
0

फ्रेंच फ्राईस

Mar-13-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंच फ्राईस कृती बद्दल

लहान मुलांच्या आवडीचे स्नॅक्स प्रकार ...पण मी याला थोडा ट्विस्ट दिला आणि आवडीच्या भाज्या व सॉसेस टाकून त्याला थोड चटपटीत केलंय .

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • बॅचरल्स
 • फ्रेंच
 • स्टर फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. बटाटे २
 2. सिमला मिर्ची १
 3. कांदा १
 4. टोमॅटो १
 5. पत्ता कोबी बारीक चिरलेली १/२ वाटी
 6. चिली सॉस २ चमचे किंवा आवडीनुसार
 7. टोमॅटो सॉस २ चमचे किंवा आवडीनुसार
 8. तेल
 9. मिठ
 10. कॉर्न फ्लोअर २ चमचे
 11. चाट मसाला

सूचना

 1. बटाटे सोलून पातळ पातळ कापून पाण्यात बुडवून ठेवा
 2. पत्ता कोबी बारीक चिरून , कांदा उभा कापून , सिमला मिरची उभ्या तुकड्यात कापून आणि टोमॅटो पण उभे फोडी चिरून घ्या
 3. बटाटे पाण्यातून काढून पुसून घेवून कॉर्न फ्लोअर व मीठ एकत्र करून भुरभुरवा आणि गरम तेलात कुरकुरीत तळून बाहेर काढा
 4. गॅस वर एका पैन मध्ये अगदी थोडे तेल घालून चिरून ठेवलेले साहित्य घालून हाय फ्लेम वर २-३ मिनिट परतून घ्या
 5. मग आवडेल तेवढा चिली सॉस व टोमॅटो सॉस घालून गरज वाटलयास थोडे मीठ घालून मिक्स करावे आणि लगेच तळून ठेवलेले बटाटे घालून चांगले मिक्स करून घ्या .
 6. तयार आहे फ्रेंच फ्राईज
 7. सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घ्या व वरून थोडा चाट मसाला भुरभूरुन खायला दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर