मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:मूठीया दोडका भाजी :cherry_blossom:

Photo of Muthia  dodka  bhaji by Varsha Deshpande at BetterButter
1898
2
0.0(0)
0

:cherry_blossom:मूठीया दोडका भाजी :cherry_blossom:

Mar-18-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:मूठीया दोडका भाजी :cherry_blossom: कृती बद्दल

तशी ही भाजीची रेसीपि माझ्या आज्जीची आहे .धारीवाले दोडके आणले की नेहमी आई ..माझी आई अशी भाजी करायची म्हणून करत असे .आणी आम्हाला ती आवडायला लागली तीच आज शेअर करते आहे .।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूठीया साठी . .
  2. गव्हाची कणीक 2वाटि
  3. 2चमचे तेल
  4. हळद 1/2चमचा छोटा.
  5. जीर 1चमचा
  6. हिंग छोटा1/2चमचा .
  7. ओवा 1/2चमचा .
  8. मीठ 1/2चमचा .
  9. तीळ 1/2चमचा .
  10. तीखट किंवा हिरवि मीर्ची पेस्ट 1/2चमचा .
  11. भाजी साठी .....
  12. धारी वाले दोडके 4--5 .
  13. कादा मोठा 1बारीक चिरलेला .
  14. अद्रक ,लसून पेस्ट 1-ते 1 1/2चमचा
  15. हळद 1/2चमचा .
  16. तीखट 1चमचा .
  17. हिंग 1/2चमचा .
  18. धणे पूड 1/2 .
  19. गरम मसाला 1 चमचा .
  20. आमचूर पावडर 1 1/2 चमचा
  21. साखर 1चमचा .
  22. मीठ टेस्ट नूसार
  23. कोथींबीर थोडी
  24. तेल 4-5 चमचे.
  25. मोहरी ,जीर 1-चमचा .

सूचना

  1. प्रथम गँसवर कढईत तेल ,जीर ,हिंग आणी हळद टाकावि आणी कणीक टाकून भाजायला ठेवणे .
  2. ते लो ते मीडीयम आचेवर भाजत असतांनाच दोडके सोलून चिरून घेणे .
  3. कणीक लालसर भाजून झाली की त्यात ओवा ,मीठ ,तीळ तीखट टाकून पाण्याने घट्ट भीजवून घेणे .
  4. आणी त्याचे मूठीया वळून घेणे तो पर्यंत गँस वर भाजी करण्यासाठी कढई ठेवणे .
  5. आणी त्यात तेल जीर ,मोहरी ,हिंग ,आल लसून पेस्ट आणी कांदा ,कोथिंबीर टाकून परतून घेणे
  6. नंतर त्यात हळद ,तीखट ,गरम मसाला टाकून दोडके चीरलेले टाकणे
  7. आणी त्यात आमचूर,साखर ,मीठ टाकून हलवून घेणे आणी वरून मूठीया ठेवून 2-3 मींट झाकण ठेऊन वाफ काढणे .
  8. नंतर झाकण काढून हलक्या हाताने मीक्स करून परत 3-4मींट ठेवणे मंद आचेवर हव असल्यास थोड पाणी टाकून शीजवून घेणे .
  9. मूठीया दोडके भाजी तयार वरून कोथिंबीर , टाकून सर्व करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर