मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज समर रोल्स

Photo of Veg Summer Rolls by Sanika SN at BetterButter
59
4
0.0(0)
0

व्हेज समर रोल्स

Mar-19-2019
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज समर रोल्स कृती बद्दल

अत्यंत पौष्टिक व झटपट पाककृती

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • चायनीज
 • बॉइलिंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. रेडीमेड राईस पेपर / शीट्स
 2. पातळ उभा चिरलेला कोबी
 3. पातळ उभं चिरलेलं गाजर
 4. पातळ उभी चिरलेली काकडी
 5. थोडे मीठ घालून उकडवून घेतलेल्या न्युडल्स (तुम्ही राईस न्युडल्स, पास्ता , काही ही वापरु शकता)
 6. १/२ टीस्पून पांढरी मिरपूड
 7. १ टेस्पून टोमॅटो सॉस
 8. स्वीट चिली सॉस सर्व्हींगसाठी

सूचना

 1. साहित्याचा फोटो
 2. प्रथम एका ताटात थोडे पाणी घेऊन राईस पेपर / शीट्स दोन्ही बाजूने १० सेकंद भिजवून घ्या.
 3. भिजवलेली राईस पेपर / शीट्स एका कोरड्या ताटात किंवा चॉपींग बोर्डवर अलगदपणे ठेवा. (पाण्यात भिजवल्यामुळे नाजूकपणे हाताळावे)
 4. त्यावर उकडलेल्या न्युडल्स , गाजर, कोबी व काकडी ठेवा.
 5. थोडीशी पांढरी मिरपूड भुरभुरा व थोडासा टोमॅटो सॉस घाला. (जास्त सॉस घालू नका नाहीतर पेपर / शीट्स ओलसरपणामुळे फाटू शकतात)
 6. अलगदपणे रोल गुंडाळायला सुरुवात करा, कडा दुमडा व पुन्हा रोल गुंडाळा.
 7. असे सर्व रोल तयार करुन घ्या.
 8. हे समर रोल्स तुम्ही स्वीट चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर