मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेंच टोस्ट

Photo of French Toast by Sanika SN at BetterButter
670
1
0.0(0)
0

फ्रेंच टोस्ट

Mar-19-2019
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंच टोस्ट कृती बद्दल

सकाळच्या नाश्त्याला बनणारा झटपट पदार्थ

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ अंडी
  2. ४ शिळे ब्राऊन ब्रेड स्लाईसेस (तुम्ही कुठलाही ब्रेड वापरू शकता व्हाईट ब्रेड, Challah ब्रेड, फ्रेंच Baguette पण शिळा वापरावा म्हणजे ब्रेड मिश्रण चांगले शोषून घेईल)
  3. १/२ वाटी दूध
  4. साखर चवीप्रमाणे
  5. १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स

सूचना

  1. साहित्याचा फोटो
  2. अंडी फोडून घेणे. त्यात दूध, साखर, व्हॅनिला एसेन्स घालून चांगले फेटून घेणे.
  3. नॉन-स्टीक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा रोजच्या वापरातले तेल घालून गरम करावे. तुम्ही बटर ही वापरू शकता.
  4. अंड्याच्या मिश्रणात ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूंनी चांगले बुडवून घ्यावे व पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करुन घ्यावे.
  5. अशा पद्दतीने इतर ब्रेड स्लाईसेस फ्राय करुन घ्यावे.
  6. तयार फ्रेंच टोस्टवर पिठीसाखर भुरभुरून ब्रेकफास्टला सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर