मुख्यपृष्ठ / पाककृती / Rose Syrup Coconut Malai Burfi

Photo of Rose Syrup Coconut Malai Burfi by Deepa Gad at BetterButter
122
10
0.0(0)
0

Rose Syrup Coconut Malai Burfi

Mar-27-2019
Deepa Gad
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. नारळाचे तुकडे मिक्सरवर बारीक केलेले ३ कप
 2. पिठीसाखर १ १/२ कप
 3. मिल्क पावडर ४ च
 4. मलई ४ च
 5. वेलची पूड १/२ च
 6. रोझ सिरप ३-४ च

सूचना

 1. नारळाचे तुकडे करून त्याचा मागचा काळा भाग काढून टाका, तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करा.
 2. एक गॅसवर कढाई व दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवा.
 3. कढईत व पॅन वर प्रत्येकी दीड कप नारळाचे वाटलेले मिश्रण घाला.
 4. कढईत १ कप पिठीसाखर घाला
 5. पॅनमध्ये १/२ कप पिठिसाखर घाला
 6. दोन्ही मिश्रणात प्रत्येकी २-२ च मलई घाला.
 7. दोन्ही मिश्रण घट्ट होत आली की कढईत वेलची पूड घाला.
 8. आणि पॅनमध्ये रोझ सिरप घाला
 9. गॅस बंद करून दोन्ही मिश्रणात प्रत्येकी २-२ च मिल्क पावडर घाला.
 10. प्लास्टिक डब्यात बटर पेपर लावून त्यात पहिले रोझ सिरपचे अर्धे मिश्रण घालून दाबून घ्या.
 11. त्यावर सफेद मिश्रण अर्धे घालून वाटीला तूप लावून त्याने समान दाबून घ्या. डबा फ्रीजमध्ये ५ मिनिटे ठेवा.
 12. दोन्ही अर्धे राहिलेले मिश्रण ताटाला तूप लावून त्यात थापून घ्या
 13. हार्ट व स्टार च्या आकाराच्या मोल्डने ताटातल्या मिश्रणाला आकार द्या.
 14. फ्रीझमधून डबा काढून बटर पेपर सहित बर्फी काढा व वड्या पाडा.
 15. वरून पिस्त्याचे काप व डेसिकेटेड कोकोनट भुरभुरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर