मुख्यपृष्ठ / पाककृती / चीझ गार्लिक टोस्ट

Photo of Cheez Garlic Tost by SUCHITA WADEKAR at BetterButter
623
2
0.0(0)
0

चीझ गार्लिक टोस्ट

Mar-29-2019
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीझ गार्लिक टोस्ट कृती बद्दल

हि रेसिपी मुलांना अतिशय आवडते, शिवाय येथे मी गव्हाचा ब्रेड वापरला आहे आणि सोबत भाज्या हि वापरल्या आहे, त्यामुळे ही रेसिपू पौष्टीकहि झाली आहे आणि खूप सुंदर लागते अगदी पिझ्झा सारखी पण पिझ्झा बेस मैद्यापासून बनवलेला असल्यामुळे पोटाला त्रास होण्याची शक्यता असते मात्र हे गार्लिक टोस्ट एकदम मस्त लागतात .. कमी साहित्य आणि कमी वेळ ... आणि पटकन गट्टम होतात.. शिवाय सगळे खुश ...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्राउन ब्रेड 1
  2. गाजर 1 वाटी
  3. कोबी 1 वाटी
  4. सिमला मिरची 1 वाटी
  5. गार्लिक चीझ स्प्रेड
  6. अमूल बटर
  7. चीझ क्युब 2
  8. मिरी पावडर

सूचना

  1. प्रथम गजर, कोबी, सिमला मिरची बारीक चिरून घ्यावी.
  2. ब्रेड स्लाईस, चीझ, बटर, चीझ स्प्रेड, काळी मिरी पावडर आणि बारीक चिरलेल्या भाज्या असे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.
  3. तव्यावर बटर टाकून ब्रेड स्लाईस हलकासा दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  4. त्यानंतर ब्रेडच्या एका साईडला बटर, चीझ गार्लिक स्प्रेड लावावे, त्यावर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची घालावी, वरून मिरी पावडर घालावी व चीझ किसून घालावे आणि तव्यावर बटर सोडून त्यावर हा ब्रेड स्लाईस ठेवावा व वरून झाकण ठेवावे आणि गॅस बारीक करावा.
  5. दोन मिनिटांनी झाकण उघडावे, चीझ वितळून खालून ब्रेड भाजला असेल ..
  6. आता याचे हव्या त्या आकारात पिसेस करून सर्व्ह करावे "चीझ गार्लिक टोस्ट"

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर