मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट डिश - बनाना-स्ट्रॉबेरी इंजिन

Photo of Fruit Dish - Banana Stroberi Engine by SUCHITA WADEKAR at BetterButter
1391
2
0.0(0)
0

फ्रुट डिश - बनाना-स्ट्रॉबेरी इंजिन

Mar-29-2019
SUCHITA WADEKAR
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट डिश - बनाना-स्ट्रॉबेरी इंजिन कृती बद्दल

हे फळांचे इंजिन माझ्या मुलीने बनवले आहे ... बनवायला अतिशय सोपे आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या फळांच्या फ्रूट स्टिक तुम्हाला बनवता येतील :thumbsup:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. केळी 4
  2. स्ट्रॉबेरी अर्धा किलो
  3. टूथपिक 10 ते 12
  4. गोल चकत्या करण्यासाठी सूरी

सूचना

  1. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्यावी
  2. केळ सोलून त्याचा पुढचा आणि मागचा भाग कापावा आणि केळ अर्धे कापावे.
  3. अर्धा भाग तसाच ठेवून उरलेल्या अर्ध्या भागाच्या गोल चकत्या कापाव्यात
  4. काही स्ट्रॉबेरीच्याही गोल चकत्या कापून घ्याव्यात.
  5. एका टूथपिकमध्ये केळ व स्ट्रॉबेरीची एक एक चकती घालावी व हि टूथपिक केळाच्या मागच्या साईड मध्ये खुपसावी व तुसऱ्या बाजूने स्ट्रॉबेरी व केल्याची चकती घालावी
  6. अशाप्रकारे पुढची साईड हि पूर्ण करावी. पुढच्या साईड ला स्ट्रॉबेरीची चकती टूथपिक च्या सहाय्याने बसवावी.
  7. आता यावर मोठी छोटी या क्रमाने बसतील तेवढी स्ट्रॉबेरी ठेवावी. आपले बनाना स्ट्रॉबेरी इंजिन तैय्यार !!
  8. सोबत स्ट्रॉबेरीच्या फ्रूट स्टिक सुद्धा तयार कराव्यात आणि डिश सर्व्ह करावी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर