मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पीठांचा डोसा

Photo of Mix flour dosa by Aarti Nijapkar at BetterButter
725
2
0.0(0)
0

मिक्स पीठांचा डोसा

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पीठांचा डोसा कृती बद्दल

मिश्र पीठांचा डोसा अगदी पटकन होणारी अशी पाककृती आहे तर ह्यात तांदुळाचे पीठ, उरद डाळ पीठ ,ओट्स ,बाजरीचे,ज्वारीचे ,चणा डाळीचे पीठ , हिरवे मूग पीठ व दही आणि काही मसाले वापरून तयार केलेला मिक्स पीठांचा डोसा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळाचे पीठ १/२ वाटी
  2. उरद डाळीचे पीठ २ मोठे चमचे
  3. हिरवे मूग पीठ २ मोठे चमचे
  4. ओट्स पीठ २ मोठे चमचे
  5. बाजरीचे पीठ १ मोठा चमचा
  6. ज्वारीचे पीठ २ मोठे चमचे
  7. दही २ मोठे चमचे
  8. हिरवी मिरची लसूण पेस्ट १/२ लहान चमचा
  9. जिरे पूड १/२ लहान चमचा
  10. हळद किंचित
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल

सूचना

  1. एका भांड्यात सर्व मीठ एकत्र करून घ्या
  2. मग त्यात दही , मिरची लसूण पेस्ट , किंचित हळद व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  3. गरजेनुसार पाणी घालून डोस्याच्या मिश्रणासारखे बनवून घ्या मग २ ते ३ मिनूते झाकून ठेवा
  4. तोपर्यंत गॅस वर तवा ठेवून तापवून घ्या
  5. पिठाचे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या
  6. तव्यावर पीठ घालून डोस्यासारखे बनवून घ्या पण येथे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहे
  7. अश्याप्रकारे मिक्स पीठांचा डोसा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर