मुख्यपृष्ठ / पाककृती / दोन थर पॅटिस

Photo of Double layer pattice by Aarti Nijapkar at BetterButter
27
2
0.0(0)
0

दोन थर पॅटिस

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोन थर पॅटिस कृती बद्दल

दोन थर पॅटिस असं मुद्दाम म्हटले आहे कारण आपण खाण्याआधी कळले पाहिजे की आपण काय खातो किंवा नाव ऐकून काय आहे खाऊन बघू ...तर दोन थर म्हणजे बाहेरील आवरण उकडलेले बटाटे आणि काही मसाले व आत चटपटीत हिरवे तर मस्त अशी चव जरा नेहमीपेक्षा वेगळी अशी ही दोन थर पॅटिस...साहित्य कृती बघुयात

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. उकडलेला बटाटा २
 2. हिरवी मिरची चिरलेली १ लहान
 3. कोथिंबीर चिरलेली १ लहान चमचा
 4. जिरे पूड १/२ लहान चमचा
 5. धने पूड १/२ लहान चमचा
 6. गरम मसाला १/४ लहान चमचा
 7. लाल तिखट १/२ लहान चमचा
 8. मीठ चवीनुसार
 9. हिरवे मटार १/२ वाटी
 10. आमचूर पावडर १ लहान चमचा
 11. सेंधा मीठ चिमूटभर
 12. लिंबू रस १ लहान चमचा
 13. कॉर्नफ्लेक्स पूड १/२ वाटी
 14. (कॉर्नफ्लेक्स मिक्सर मध्ये पूड करून घ्यावी)
 15. तेल

सूचना

 1. प्रथम भांड्यात वाफवलेले बटाटे कुस्करून घ्या मग त्यात चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, धने जिरे पूड ,गरम मसाला,लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या
 2. एका ताटात हिरवे मटार आमचूर पावडर , सेंधा मीठ व लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या
 3. बटाट्याच्या मिश्रणाचे मध्यम गोळे करून त्याला पसरट करून त्यात हिरव्या मटाराचे मिश्रण घालून सर्व बाजून बंद करून त्याला पॅटिस चा आकार द्या थोडंस दाबून घ्या मग कॉर्नफ्लेक्स च्या चुर्यात सर्व बाजूनी घोळवून घ्या
 4. अश्याप्रकारे सर्व पॅटिस बनवून घ्या
 5. तेल तापवून मग मध्यम आचेवर लालसर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे
 6. अश्याप्रकारे दोन थर पॅटिस तयार आहेत
 7. हे पॅटिस चटणी किंवा केचप सोबत खा किंवा पॅटिस चाट बनवून खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर