BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / घोसाळ्याची भजी

Photo of Ghosalyavhi bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
0
1
0(0)
0

घोसाळ्याची भजी

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घोसाळ्याची भजी कृती बद्दल

घोसाळ्याची भजी झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. घोसाळे १ (साधारण ८ ते १० इंच लांबीचा)
  2. बेसन ३/४ किंवा आवश्यकतेनुसार
  3. पाणी ३/४ कप किंवा आवश्यकतेनुसार
  4. ओवा १/४ लहान चमचा
  5. लाल तिखट १ लहान चमचा
  6. हळद १/२ लहान चमचा
  7. जिरे पूड १/२ लहान चमचा
  8. धने पूड १/२ लहान चमचा
  9. गरम मसाला १/४ लहान चमचा
  10. कोथिंबीर बारीक चिरलेली १ लहान चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. घोसाळे धुवून पुसून घ्यावे मग सोलून त्याच्या एक ते दीड सेमीच्या चकत्या (काप)कराव्यात
  2. एका गोलसर भांड्यात बेसन, ओवा, लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला,मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ भिजवावे पीठ घट्ट किंवा पातळ नसावे 
  3. मध्यमसर भिजवावे बेसनच्या मिश्रणाला १ ते २ मिनिटे चमच्याने चांगले फेटून घ्यावे बेसनचं मिश्रण चांगलं फुगून येईल
  4. कढईत तेल गरम करा तेल गरम झाले कि  घोसाळ्याचे तुकडे बेसनाच्या मिश्रणात बुडवून तेलात टाकावेत गॅस मध्यम ठेवावे मग दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत 
  5. गरमागरम घोसाळ्याची भजी तयार चटणी किंवा केचप सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर