मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड चीझ पॅटिस

Photo of Bread cheese Pattice by Aarti Nijapkar at BetterButter
520
1
0.0(0)
0

ब्रेड चीझ पॅटिस

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड चीझ पॅटिस कृती बद्दल

ब्रेड चीझ पॅटिस हि मस्त अशी पाककृती आहे मध्यम असं मिश्रण करून त्यात ब्रेड चे तुकडे घोळवून तव्यावर कमी तेलात फ्राय करायचे आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड चे स्लाइस ५ ते ६
  2. मस्का /लोणी १/३ वाटी
  3. चीझ १/३ कप
  4. बेसन १/२ कप
  5. तांदळाचे पीठ १ मोठा चमचा
  6. हिरवी मिरची चिरलेली १
  7. आलं लसून पेस्ट १/२ लहान चमचा
  8. कोथिंबीर बारीक चिरलेली १ मोठा चमचा
  9. हळद १/४ लहान चमचा
  10. लाल तिखट १ लहान चमचा
  11. गरम मसाला १/२ लहान चमचा
  12. तेल
  13. पाणी गरजेनुसार

सूचना

  1. ब्रेड त्रिकोणी कापतील असे कापा
  2. एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन , आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची ,कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, हळद ,किसलेले चीझ, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा
  3. मिश्रण फार घट्ट व पातळ नसावे
  4. मिश्रणात चीझ किसून घालावे
  5. ब्रेड ला मस्का लावून ते मिश्रणात घोळवून घ्या
  6. तवा तापवून त्यावर थोडे तेल व मस्का घालून घोळवलेले ब्रेडचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे
  7. तयार झालेल्या ब्रेड पॅटीस वर चीझ किसून घाला
  8. चटणी किंवा केचप सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर