मुख्यपृष्ठ / पाककृती / मटण बिर्याणी

Photo of Mutton Biryani by Shabnam Khan at BetterButter
11410
75
4.6(1)
0

मटण बिर्याणी

Sep-03-2016
Shabnam Khan
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण बिर्याणी कृती बद्दल

तृप्त करणारी हैद्राबादी मटण बिर्याणी .

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • ईद
  • आंध्र
  • स्टर फ्रायिंग
  • सिमरिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 2

  1. 500 ग्रॅम मटण
  2. 3 कप बासमती तांदुळ
  3. 4 कांदे
  4. 1-2 टोमॅटो
  5. धणे पावडर 1 टी स्पून
  6. जीरे पावडर 1 टी स्पून
  7. खडा मसाला - तमालपत्र (1),वेलदोडे (2),लवंगा (5),दालचिनी ( 1 तुकडा )
  8. 1 टी स्पून शहाजीरे
  9. मुठभर कोथिंबीर व पुदिन्याची पाने
  10. मॅरीनेट करण्यासाठी 1 कप दही
  11. आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून
  12. खाद्य तेल / तूप गरजेनुसार
  13. 2 टी स्पून लिंबाचा रस
  14. चवीनुसार मीठ

सूचना

  1. मॅरीनेट करण्यासाठी, दही, मीठ, हळद आणि आल्ले लसूण पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन चांगले मिसळून घ्यावे. त्यात मटणाचे तुकडे टाकून 1-2 तासभर मॅरीनेट करावे.
  2. या दरम्यान बासमती तांदुळ सुमारे 30 मिनिटे भिजवून ठेवावेत ( त्यामुळे भात मोठा आणि शिजल्यावर मऊ व हलका होण्यास मदत होईल ) .
  3. मॅरीनेट पूर्ण झाल्यावर, प्रेशर कुकर घेऊन त्यात तेल टाकणे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंगा घालाव्यात आणि काही सेकंदानंतर बारीक केलेला किंवा दळलेला कांदा घालावा. कांदा तांबूस झाल्यावर आणखी आल्ले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद आणि मिरची पावडर, धणे व जीरे पावडर मिसळावी.
  4. सर्व घटक व्यवस्थित मिसळून घ्यावेत. तेल बाजूने बाहेर पडायला लागल्यावर मॅरीनेट केलेले मटण त्यात टाकावे. चांगला वास येण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालावी.
  5. 1/4 ग्लास पाणी घालून झाकण लावावे. 5 शिट्ट्या येईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवावे.
  6. दुसर्‍या बाजूला, एका भांड्यात तांदुळ शिजवण्यासाठी पाणी उकळून घ्यावे . बिर्याणीला चांगला वास येण्यासाठी त्यात थोडे शहाजीरे, वेलदोडे व जायपत्री घालावी ( तांदुळ 70% शिजवावा, कारण दम करतेवेळी उरलेले शिजविण्याची गरज असते )
  7. एका वेगळ्या पॅनमध्ये, बारीक चिरलेला कांदा तळावा आणि बाजूला ठेवावा.
  8. थर रचण्यासाठी, बिर्याणीच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून तेलकट करून घ्यावे. शिजलेले मटण आणि भात यांचा एक एक थर रचत जावे. सगळ्यात वरच्या थरावर तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना टाकावा, त्या थरावर अर्धे लिंबू सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने पिळावे .
  9. सुमारे 20 मिनिटे शिजवावे. आता बिर्याणी तयार झाली.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Lekha Ausarkar
Feb-05-2019
Lekha Ausarkar   Feb-05-2019

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर