मुगाचे ढोकळे | Mung Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Uma Raghuraman (aka) Masterchefmom  |  2nd Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mung Dhokla by Uma Raghuraman (aka) Masterchefmom at BetterButter
मुगाचे ढोकळे by Uma Raghuraman (aka) Masterchefmom
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1906

0

मुगाचे ढोकळे recipe

मुगाचे ढोकळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung Dhokla Recipe in Marathi )

 • 1. मुगाची डाळ - 1 वाटी (250 ग्रॅम्स)
 • 2. सोडा - 1 लहान चमचा
 • 3. मीठ - स्वादानुसार
 • 4. खवलेले ओले खोबरे - 1 मोठा चमचा
 • 5. बिया काढून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - 3
 • हिंग - 1/4 लहान चमचा
 • तूप/तेल - 1 मोठा चमचा
 • साखर (ऐच्छिक) - 1 मोठा चमचा (वाटल्यास)

मुगाचे ढोकळे | How to make Mung Dhokla Recipe in Marathi

 1. मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवा.
 2. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून त्याची मऊ पेस्ट बनवा. त्यात हिंग आणि मीठ घाला. तुम्हाला जर गोडसर ढोकळे आवडत असतील, तर त्यात थोडी साखर घाला.
 3. एका केक पॅनला किंवा कोणत्याही भांड्याला तेल लावा.
 4. डाळीचे मिश्रण केक पॅनमध्ये घालावयाच्या वेळी त्यात सोडा मिसळा. तुम्हाला कळेल की मिश्रण फुलले आहे, आणि लुसलुशीत आणि हलके झाले आहे.
 5. मध्यम आंचेवर 15 मिनिटे ढोकळे वाफवायला ठेवा. टूथपिक घालून स्वच्छ बाहेर येईपर्यंत शिजवा आणि गॅस बंद करा.
 6. नंतर याला थंड होऊ द्या. केक पॅनमधून काढा आणि खोबऱ्याने आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा आणि चाकूने चौरस कापा.
 7. त्यावर तेल, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मोहरींनी फोडणी द्या. माझ्याकडे ताजी कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी सजविण्यासाठी कडीपत्त्याची काही पाने वापरली.

My Tip:

1. यात साखर घालणे ऐच्छिक असेल. तुम्ही एकास एक या प्रमाणात साधे पाक बनवून, ढोकळ्याला फोडणी देण्याअगोदर त्यावर शिंपडू शकता. 2. ताजे खोबरे घातल्याने देखील याचा स्वाद वाढतो. 3. तुम्ही ढोकला गरम किंवा थंड खाऊ शकता. 4. पाक शिंपडण्यापूर्वी किंवा फोडणी देण्यापूर्वी त्याला कापा, जेणेकरून तेल किंवा साखर एकसमान पसरू शकेल. 5. याला अधिक पौष्टिक बनविण्यासाठी कोणतीही किसलेली भाजी यात घालू शकता.

Reviews for Mung Dhokla Recipe in Marathi (0)