मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज दम बिर्याणी

Photo of Veg Dum Biryani by Moumita Malla at BetterButter
4745
63
5.0(0)
1

व्हेज दम बिर्याणी

Sep-09-2016
Moumita Malla
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज दम बिर्याणी कृती बद्दल

व्हेज दम बिर्याणी भाज्या नरम होईपर्यंत गरम सुगंधी मसाल्यांसोबत भाज्या आणि पनीर तुपामध्ये शिजवून बनविले जाते. त्यानंतर अर्धा शिजविलेला तांदूळ घातला जातो आणि पूर्ण शिजण्यासाठी मंद विस्तवावर झाकलेल्या भांड्यात शिजविले जाते.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • ईद
  • मुघलाई
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. भाज्यांची आमटी बनविण्यासाठी लागणारे घटक:
  2. गाजर- 2, चिरलेले
  3. कॉलिफ्लॉवरच्या कळ्या - 10 (लहान)
  4. बटन मशरूम- 6 (चिरलेले)
  5. फरसबी - अर्धी वाटी (चिरलेली)
  6. हिरवे वाटणे- अर्धी वाटी
  7. पनीर- 1 वाटी (मध्यम आकाराचे चिरावे)
  8. दही- 1/4 कप
  9. कांदे- 2, चिरलेले
  10. आल्याची पेस्ट- 1 मोठा चमचा
  11. लसणाची पेस्ट- 2 मोठे चमचे
  12. हळद- 1 लहान चमचा
  13. धणेपूड - 1 लहान चमचा
  14. लाल मिरची पूड - 1 लहान चमचा
  15. दालचिनीच्या काड्या- इंचाच्या
  16. हिरवे वेलदोडे- 3
  17. लवंगा- 4
  18. तमालपत्र - 2
  19. जिरे - अर्धा छोटा चमचा
  20. गरम मसाला पावडर- 1 लहान चमचा
  21. मीठ स्वादानुसार
  22. साखर- अर्धा लहान चमचा
  23. तेल/ तूप/ गरम केलेले लोणी- 2 मोठे चमचे + 2 छोटे चमचे
  24. बिर्याणी मसाल्यासाठी घटक:
  25. दालचिनी काडी- 1 इंचाची
  26. हिरवे वेलदोडे - 4
  27. काळे वेलदोडे - 3
  28. लवंग - 5
  29. काळी मिरी - 3
  30. दगडफुल- 1
  31. जायफळ- अर्धे
  32. जायपत्री- अर्धा लहान चमचा
  33. शाजीरा - 1 लहान चमचा
  34. धणे- 1 लहान चमचा
  35. कबाब चीनी- अर्धा लहान चमचा
  36. बिर्याणी भातासाठी घटक :
  37. बासमती तांदूळ- 2 वाट्या (15 मिनिटे पाण्यात भिजवलेले)
  38. पाणी- 4 कप
  39. हिरवे वेलदोडे- 3
  40. काळे वेलदोडे- 3
  41. लवंगा- 4
  42. दालचिनी काडी- 1 इंच
  43. दगडफुल- 1
  44. तेल- 2 लहान चमचे
  45. मीठ स्वादानुसार
  46. केशर- 1 चिमूटभर, 1 कप कोमट दुधात भिजवून ठेवलेले
  47. गुलाब पाणी- 2 लहान चमचे
  48. केवड्याचे इसेन्स- 4 थेंब
  49. सजविण्यासाठी घटक:
  50. तळलेले कांदे किंवा बिरीस्ता - 2 कांद्याचे काप, काप वेगळे करून तळा

सूचना

  1. बिर्याणी मसाला बनविण्यासाठी, सर्व मसाले पावडर एका तव्यात भाजून घ्या, त्यानंतर त्याला थंड करा आणि एकदम बारीक दळून घ्या.
  2. बिर्याणी राईस बनविण्यासाठी एक मोठी कढई घ्या, त्यात 4 कप पाणी घ्या आणि तमालपत्र, तेल आणि मीठ घाला. उकळी येऊ द्या, जेव्हा पाणी उकळू लागेल, त्यात तांदूळ घाला आणि सुमारे भात पाऊण होईपर्यंत शिजवा.
  3. याला उकळी येऊ द्या. जेव्हा पाणी उकळू लागते, त्यात तांदूळ घाला आणि भात पाऊन शिजेपर्यंत शिजवा. त्यानंतर, पाणी निथळा आणि भात एका ताटात वेगळे काढून घ्या.
  4. अंतिम तयारीसाठी, तूप/तेल एका नॉन-स्टिक किंवा जाड तळाच्या भांड्यात गरम करा. (ते भांडे एकदम मोठे असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या भांड्यात नंतर बिर्याणी बनवू शकाल.)
  5. त्यात चिरलेला कांदा घाला आणि बदामी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या. आता सर्व भाज्या, पनीर आणि किंचित मीठ घाला. त्याला 2 मिनिटांपर्यंत शिजवा.
  6. आले-लसणाची पेस्ट, बिर्याणी मसाला दह्यासह व्यवस्थित मिसळा आणि ते तव्यात टाका. याला भाज्यांसोबत मिसळा आणि 2 मिनिटांसाठी शिजवा.
  7. त्यानंतर त्यात शिजविलेला भात घाला, भात आणि भाज्यांच्या स्तरांच्या मध्यभागी एक खड्डा बनवा आणि त्यात केशर घातलेले दूध ओता.
  8. त्यात किंचित मीठ, राहिलेला मसाला, तळलेला कांदा, केवड्याचा इसेन्स, गुलाबजल घाला आणी त्यावर 1 लहान चमचा तूप घाला.
  9. तव्याला अॅल्युमिनियम फॉईलने झाका, त्यानंतर त्यावर झाकण ठेवा.
  10. मंद विस्तवावर 2 ते 3 मिनिटे शिजवा, त्यानंतर विस्तव बंद करा. त्याला 10 मिनिटांसाठी स्थिर करा.
  11. रायतासह वाढण्यासाठी व्हेज बिर्याणी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर