धुस्का | Dhuska Recipe in Marathi

प्रेषक Snehal Gurle  |  3rd Sep 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dhuska by Snehal Gurle at BetterButter
धुस्का by Snehal Gurle
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  तास
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

426

0

धुस्का recipe

धुस्का बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhuska Recipe in Marathi )

 • तांदूळ 2 वाट्या
 • चण्याची डाळ 1 वाटी
 • हिरव्या मिरच्या 4-5
 • लसणाच्या पाकळ्या 4-5
 • थोडा कडीपत्ता
 • मीठ
 • कोथिंबीर
 • बारीक चिरलेला कांदा 1

धुस्का | How to make Dhuska Recipe in Marathi

 1. तांदूळ आणि डाळ 4-5 तास भिजवून ठेवा.
 2. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडे पाणी घालून वाटून घ्या.
 3. मिश्रण अधिक घट्ट किंवा पातळ नसले पाहिजे. त्यात थोडी हळद आणि मीठ घाला.
 4. एका कढईत तेल गरम करा. तेल अधिक गरम करू नका. डोसा बनविण्यासाठी जो गोलाकार डाव वापरतो तो घ्या.
 5. डावच्या मदतीने मिश्रणाला हळुवारपणे तेलात सोडा.
 6. दोन्ही बाजू तळा. कोणत्याही भाजीबरोबर, बटाटा-टोमॅटोची भाजी किंवा फक्त लोणच्याबरोबर वाढा.

My Tip:

मिश्रण वाटून घेतल्यानंतर त्यात कडीपत्ता, कोथिंबीर आणि एकदम बारीक चिरलेला कांदा घातल्याने व्यंजन अतिशय रुचकर बनेल.

Reviews for Dhuska Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo