मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज पुलाव

Photo of Veg Pulao by BetterButter Editorial at BetterButter
6932
629
4.7(0)
0

व्हेज पुलाव

Sep-04-2015
BetterButter Editorial
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज पुलाव कृती बद्दल

आपल्या आनंदासाठी योग्य अशी प्रेशर कुकरमध्ये शिजवलेली सुवासिक, स्वादिष्ट शाकाहारी भाताची डीश.

रेसपी टैग

  • व्हेज
  • नॉर्थ इंडियन
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप बासमती तांदुळ
  2. 1 कप चिरलेल्या भाज्या ( गाजर, बीन्स, मटार )
  3. 2 पातळ चिरलेले कांदे
  4. 1 चिरलेला टोमॅटो
  5. 3 कप भाजी स्टाॅक
  6. 2 टेबल स्पून तेल
  7. 1 टी स्पून लिंबाचा रस
  8. 1 टी स्पून तुकडे केलेले आल्ले व लसूण
  9. गरजेनुसार मीठ
  10. 3-4 काळी मिरी
  11. 2-3 लवंगा
  12. 2 वेलदोडे
  13. 1 तमालपत्र
  14. 1 इंच दालचीनी
  15. 1 टी स्पून जीरे

सूचना

  1. तांदुळ स्वच्छ धुवून घेणे. 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे. भाज्या अर्ध्या शिजवून घेणे.
  2. पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलदोडे घालवेत आणि एक मिनिट हलवावे .
  3. कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतावे.
  4. आल्ले, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून परतावे.
  5. आता टोमॅटो घालून 2 मिनिटे परतून तळावे.
  6. अर्ध्या शिजवलेल्या घालाव्यात आणि 2 मिनिटे परतावे.
  7. आता तांदुळ टाकावेत आणि सर्व पदार्थ तांदुळावर चांगल्या प्रकारे आवरण होईपर्यंत परतत रहावे.
  8. त्यामध्ये मीठा बरोबर लिंबाचा रस टाकावा.
  9. पाणी (3:1 प्रमाण ) घालावे, झांकण लावून तांदुळ पूर्णपणे शिजू द्यावेत .
  10. आचेवरून काढावे आणि काकडी सॅलड / लसूण रायत्या सोबत खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर